नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : आजच्या काळात मानसिक आरोग्य (Mental Health) ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत तसंच सर्व वयोगटातील महिला आणि पुरुषांमध्ये डिप्रेशन (Depression) हा आजार दिसून येत आहे. डिप्रेशन ग्रस्त रुग्णांना औषधं, थेरेपीचा आधार घ्यावा लागतो. तरी काही लोकांमध्ये या आजाराची तीव्रती इतकी जास्त असते की कोणतंही औषध त्यांना लागू पडत नाही, डिप्रेशनमधून त्यांची सुटका होत नाही.
36 वर्षांच्या साराची (Sarah) केस काहीशी अशीच आहे. ती गेल्या अनेक वर्षापासून डीप डिप्रेशनचा सामना करत होती. तिच्यावर अँटी डिप्रेशनेटस, इलेक्ट्रोकॉन्वल्सिव्ह थेरेपीच्या सहाय्यानं उपचार केले गेले. मात्र तरीदेखील ती या आजारातून बरी होत नसल्याचं पाहून शेवटी डॉक्टरांनी तिच्यावर एक प्रयोग करण्याचं ठरवलं. डॉक्टरांनी तिच्यावर ब्रेन इम्प्लांट (Brain implant) केला.
डॉक्टरांनी पूर्ण एक दिवस शस्त्रक्रिया करत ब्रेन इम्प्लांट केला (Brain implant in depression patient). या प्रक्रियेत साराच्या कवटीला एक छिद्र पाडलं गेलं. त्यानंतर तिच्या कवटीच्या उजवीकडील खालीलबाजूस असेलल्या हाडाखाली एक पल्स जनरेटर (Pulse Generator) बसवण्यात आलं.
हे वाचा - दोरी उड्या मारण्याचे आरोग्यासाठी आहेत इतके फायदे; आजच सुरू कराल हा व्यायाम
याबाबत डॉ. कॅथरीन यांनी सांगितलं की, "साराच्या मेंदूत व्हेंट्रल स्ट्रायटम (ventral striatum) नावाची एक पोकळी आढळून आली. त्यामुळे तिला डिप्रेशनचा त्रास होत होता. मेंदूत (Brain) असा एक अॅक्टिव्हिटी एरिया आढळला की ज्यामुळे तिचं डिप्रेशन कोणत्यावेळी सर्वाधिक वाढणार आहे, हे कळू शकतं. साराच्या मेंदूत पल्स जनरेटर इम्प्लांट केल्यानं तिच्या मेंदूच्या हालचालीवर लक्ष ठेवता येणार आहे.
तिला ज्यावेळी डिप्रेशन जाणवू लागतं, त्याक्षणी डॉक्टर बाहेरून इम्प्लांट केलेलं डिव्हाइस सुरू करतात आणि तिला काही वेळात सकारात्मकतेची जाणीव होऊ लागते. या डिव्हाइसला कार्यरत होण्यासाठी 15 मिनिटं लागतात. 15 मिनिटांतच रुग्ण आनंदी आणि सकारात्मक होतो.
हे वाचा - तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टीचं वाटतंय भय; असू शकतो Phobia, एक भीतीचा आजार
डॉक्टरांनी ब्रेन इम्प्लांट (Brain Implant) केल्यानं गेल्या एक वर्षापासून साराला आराम पडला असून, ती आता पूर्वीपेक्षा अधिक चांगलं आयुष्य जगत आहे.
बीबीसीशी बोलताना साराने सांगितलं. डिप्रेशनमुळं मी अंथरुणातून उठू शकत नव्हते. एकएक दिवस जगणं माझ्यासाठी मुश्किल झालं होतं. पण माझ्या आयुष्यात मागील काही आठवड्यात आनंद आणि सकारात्मकता निर्माण झाल्याचं सारा सांगते. आता माझ्या मनात आत्महत्येचा विचार येत नाही, मी डिप्रेशनमध्ये जात नसल्याचं ती स्पष्ट करते.
ब्रेन इम्प्लांट केलेली सारा ही आतापर्यंतची पहिलीच रुग्ण आहे. डॉक्टरांचा हा प्रयोग यशस्वी झाला असला तरी डिप्रेशनवर अजून चांगले इलाज करण्यासाठी ते या प्रयोगावर अधिक काम करू इच्छितात. डिप्रेशनच्या रुग्णांवर इलाज करण्यासाठी हा अधिक प्रगत प्रयोग ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Depression, Health, Lifestyle, Mental health