मुंबई, 14 ऑक्टोबर : खरं तर प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या प्रकारची भीती (Fear) वाटत असते. कोणाला पाण्याची भीती वाटते, तर कोणाला उंचावरून पडण्याची भीती वाटत असते. पण भीती आणि फोबिया (Phobia) यात फरक आहे. विशिष्ट प्रकारच्या भीतीला फोबिया असं म्हटलं जातं. फोबिया म्हणजे एखादी विशिष्ट वस्तू किंवा स्थितीची प्रचंड, विनाकारण आणि अवास्तव भीती वाटणं होय.
फोबिया हा इंग्रजी शब्द असून तो ग्रीक भाषेतल्या Phobos या शब्दापासून बनलेला आहे. त्या शब्दाचा अर्थ आहे भय. फोबिया म्हणजे अशी भीती की जिच्यामुळे आपलं नुकसान होईल असं आपल्याला वाटत असतं, पण प्रत्यक्षात मात्र तसं काही नसतं.
भीती वाटणं हा विकार नाही. ती मनुष्याची मूलभूत भावना आहे; पण फोबिया हा मात्र चिंतेशी निगडित विकार आहे. (Anxiety Disorder) या विकाराने अनेक व्यक्ती ग्रस्त असतात. साधारणतः 30 टक्के व्यक्ती फोबियाग्रस्त असतात, असा एक अंदाज आहे. अमेरिकन सायकिअॅट्रिक असोसिएशनने केलेल्या संशोधनात असं आढळलं आहे, की अनेक प्रकारचा फोबिया अगदी सर्वसामान्य असतो, म्हणजेच अनेकांमध्ये आढळतो.
फोबियाचे प्रकार
हायड्रोफोबिया (Hydrophobia) -पाण्याची भीती वाटते, तेव्हा त्याला हायड्रोफोबिया (Hydrophobia) असं म्हणतात.
हाइटफोबिया (Heightphobia) - उंचावरून खाली पाहण्याची आणि पडण्याची भीती वाटत असेल, तर त्याला हाइटफोबिया (Heightphobia) असं म्हटलं जातं.
मोकळी जागा किंवा गर्दीची भीती (Agoraphobia) - हा एक विशिष्ट प्रकारचा फोबिया आहे. या विकाराने ग्रस्त असलेली व्यक्ती मोकळी किंवा ओसाड जागा पाहून घाबरते किंवा काही व्यक्तींना गर्दी पाहून भीती वाटते. त्यांना असं वाटतं, की कोणती तरी शक्ती त्यांना नुकसान पोहोचवू शकते; मात्र त्यांच्या या भीतीला काही आधार नसतो. हे त्यांच्या मनाचे खेळ असतात.
सोशल फोबिया (Social Phobia) - सोशल फोबियाही असाच असतो. हा फोबिया असलेल्या व्यक्तीला एका अशा सामाजिक स्थितीचं भय वाटत असतं, की जी वास्तवात कधीच असत नाही.
हे वाचा - ऐकावं ते नवल! हिला चक्क भाज्यांची वाटते भीती; पाहताच दरदरून फुटतो घाम कारण...
अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे फोबिया असू शकतात. त्यात एखादी विशिष्ट वस्तू किंवा परिस्थितीची भीती वाटत असते. ही भीती कोणत्याही रूपात किंवा आकारात असू शकते; कारण जगभरात असंख्य प्रकारच्या वस्तू आणि परिस्थिती आहे. त्यामुळे भीतीच्या प्रकारातही वैविध्य असतं. त्यामुळे फोबियाच्या प्रकारांची गणना करणं शक्य नाही; मात्र त्यांचं काही प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येऊ शकतं.
फोबियाचं वर्गीकरण
जनावरांचा फोबिया - विंचू, कुत्रा, किडे, इत्यादी
नैसर्गिक परिस्थिती किंवा वातावरणाचा फोबिया - अंधार, प्रचंड उंची, खोली इत्यादी
रक्त किंवा वैद्यकीय वस्तू वा परिस्थितीशी संबंधित फोबिया - इंजेक्शन, तुटलेलं हाड, इत्यादी
हे वाचा - Shocking! म्हणे, भूत हिच्यासोबत करतो सेक्स; ऑर्गेझममुळेच मरण्याची गायिकेला भीती
एखाद्या विशिष्ट क्रियेबद्दलचा फोबिया - ड्रायव्हिंग, शिडीवर चढणं, इत्यादी
अन्य परिस्थिती - मोठा आवाज
उपाय काय?
तसं पाहायला गेलं, तर वैद्यकीय शास्त्रात फोबियावर इलाज नाही. ही एक मानसिक स्थिती (Mental Situation) असते. वास्तव जीवनाशी त्याचा काही संबंध नसतो. बऱ्याचदा संबंधित व्यक्तीला जीवनात आलेल्या अनुभवांशी फोबियाचा संबंध असतो. अशी एखादी स्थिती आलेली असते, की त्या वेळी प्रचंड भीती वाटलेली असते. पुढे तीच भीती मनात घर करून राहते आणि त्याचं फोबियात रूपांतर होतं. तशी स्थिती परत निर्माण झाली, तर आपलं काही तरी वाईट होईल, अशी भीती वाटत राहणं म्हणजेच फोबिया.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Mental health, Serious diseases