नवी दिल्ली, 16 डिसेंबर : निरोगी राहण्यासाठी आणि शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी सकस आहार घेणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी आहारात काही आवश्यक पोषक घटक घेणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य मुख्यत्वे आपल्या आहारावरही अवलंबून असते. मेंदू हा शरीरातील एक ऊर्जा-केंद्रित अवयव (एनर्जी इंटेंसिव ऑर्गन) आहे, ज्याला योग्य आणि चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी आवश्यक इंधन आवश्यक आहे. दिवसभर एकाग्रता आणि ऊर्जा पातळी राखण्यासाठी त्याची गरज असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मेंदूच्या आरोग्याला चालना देण्यासाठी ओमेगा-3 फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. याशिवाय इतर आरोग्यदायी पदार्थांबद्दल जाणून घेऊया. मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर पदार्थ – कॉफी - मेडिकल न्यूज टुडे डॉट कॉम च्या माहितीनुसार, बहुतेक लोक लो एनर्जी बूस्ट करण्यासाठी कॉफीचे सेवन करतात, परंतु, कॉफीमध्ये असलेले कॅफिन मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. कॅफिन मेंदूतील एन्ट्रॉपीची पातळी वाढवते, ते मेंदूची स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी प्रभावी आहे. कॉफीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, कॉफी योग्य प्रमाणात सेवन केल्यास मानसिक आरोग्याला चालना मिळते. पूर्ण धान्ये (Whole grain) - आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन ई असलेल्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. संपूर्ण धान्य ही पोषक तत्वांनी समृद्ध असतात तसेच व्हिटॅमिन ई साठी उत्तम पर्यायांपैकी एक आहेत, यासाठी, तपकिरी तांदूळ, बार्ली, बल्गर गहू, दलिया आणि तृणधान्यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. अंडी - अंडी शारीरिक आरोग्यासाठी तसेच मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक अॅसिडने समृद्ध असलेल्या अंड्यांचे नियमित सेवन केल्याने मेंदूचे आरोग्य सुधारते आणि स्मरणशक्ती वाढते. म्हणूनच नाश्त्यात अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. भुईमूग - शेंगदाणे अनेक आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहेत तसेच असंतृप्त चरबी आणि प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे, जे ऊर्जा पातळी वाढविण्यात मदत करते. शेंगदाण्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि खनिजे मेंदूला निरोगी ठेवतात, तर त्यात असलेले रेसवेराट्रोल न्यूरोलॉजिकल रोगांचा धोका कमी करण्यास मदत करते. हे वाचा - गॉसिपिंगमुळे ताण होतो कमी! या चुकीच्या सवयी आरोग्यासाठी ठरू शकतात फायद्याच्या फॅटी फिश - फॅटी माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड भरपूर असतात, त्यामुळे मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवण्यास आणि मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यास मदत करतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ओमेगा 3 फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांचे सेवन मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे वाचा - ‘त्या’ समुद्रकिनाऱ्यावर भलं मोठं नेमकं काय होतं? भूत की एलीयन (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.