मुंबई, 2 जानेवारी : थोड्याच काळात आता 10वी - 12वी सह इतर परीक्षांना सुरुवात होईल. या परीक्षांची बहुतांश मुलांनी त्याची तयारी सुरू केली आहे. परीक्षा जवळ आल्यावर मुलांना भीती आणि त्यांच्यावर परफॉर्मन्स प्रेशर वाढणे सामान्य आहे. बुद्धी तीक्ष्ण बनवण्यासाठी मुलं अनेक पद्धती वापरतात. पण कधी कधी अभ्यासाचं दडपण मनावर इतकं वरचढ ठरतं की मुलांचा मेंदू अभ्यासाचं करणं थांबवतो.
अशा परिस्थितीत मेंदूच्या व्यायामाचा उपयोग मुलांची बुद्धी तीक्ष्ण करण्यासाठी करता येतो. कोणत्याही वयोगटातील मुले हा व्यायाम सहज करू शकतात. हे केवळ बुद्धीच तीक्ष्ण करत नाही, तर मेंदूच्या आरोग्यावर देखील सकारात्मक परिणाम करू शकते. ज्या मुलांना टेन्शनशिवाय परीक्षेची तयारी करायची आहे, त्यांनी नियमित या व्यायामांचा सराव करावा. चला जाणून घेऊया ते व्यायाम कोणते आहेत.
हेलीकॉप्टर पॅरेंटिंगमुळे मुलांचे होते नुकसान; तुमच्या संगोपनाची पद्धत अशी नाही ना?
स्वतःला प्रश्न विचारा
daheldi.com नुसार, परीक्षेदरम्यान मेंदूचा दबाव कमी करण्यासाठी, फॅन्सी कॉम्प्युटर गेम्स आणि स्क्रीन सोडा आणि कागद आणि पेन वापरा. या व्यायामामध्ये अनेक याद्या तयार केल्या जाऊ शकतात, ज्यामध्ये किराणा सामान, दैनंदिन कामे आणि बजेट समाविष्ट केले जाऊ शकते. यादी बनवल्यानंतर दोन ते तीन तासांनंतर, ती आठवा आणि पुन्हा लिहा. मग यादीतील किती आयटम मुलं लक्षात ठेवता येतात ते पाहा. त्यामुळे मेंदू जलद गतीने काम करतो.
गोष्ट सांगा
गोष्ट सांगणं अनेक लोकांना बालिश वाटू शकते, परंतु गोष्ट सांगणं ही क्रिया मनाला आराम आणि उत्साही होण्यास मदत करू शकते. पुस्तकी गोष्ट सांगायची गरज नाही, या उपक्रमात जीवनाशी निगडीत मजेदार किस्सेही शेअर करता येतील. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होईल.
नवीन खेळ खेळा
हृदयाचे पंपिंग मेंदूलाही पंप करते. मुलाचे मन आणि शरीर उत्तेजित करणार्या ऍथलेटिक गेम खेळा. उदाहरणार्थ योगा, गॉल्फ, टेनिस आणि क्रिकेट खेळून मन प्रसन्न आणि मोकळे होईल. तसेच जिंकल्याची भावना मुलाच्या मनाला वेगाने काम करण्यास प्रवृत्त करेल.
मेंदूशी संबंधित मोटर स्किल्स विकसित करा
मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी अशी एखादी क्रिया करा ज्यामध्ये हात, डोळे आणि मेंदूचा वापर होईल. मोटर स्किल्स विकसित करण्यासाठी विणकाम, पेंटिंग किंवा कोडी सोडवण्याचा प्रयत्न करा. तसेच या क्रियादरम्यान च्युइंग गम एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारू शकते. परीक्षेच्या वेळी मेंदूचा व्यायाम केल्याने अभ्यासातील एकाग्रता वाढते. तसेच अभ्यास करताना ब्रेक घेतल्याने मन शांत आणि स्थिर होऊ शकते.
पालकांनो मुलांना दूध-बिस्कीट देत असाल तर सावधान! Milk Biscuit Syndrome चा धोका
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Brain, Health, Health Tips, Lifestyle, Parents and child, Types of exercise