मुलांच्या आयुष्यावर सतत हेलीकॉप्टरसारखे घिरट्या घालणे असा या शब्दाचा अर्थ होतो. संशोधनानुसार कडक पालकत्वामुळे मुलांमध्ये सुधारणा होण्याऐवजी उलट परिणाम होतात.
अशी मुलं हट्टी होतात आणि वाद घालू लागतात. काही पालक मुलांच्या प्रगतीबाबत आणि भविष्याविषयी एवढे उत्सुक असतात की ते मुलांच्या नकळत त्यांचे सर्व निर्णय स्वतः घेतात. येथूनच हेलीकॉप्टर पॅरेंटिंग सुरू होते.
हेलीकॉप्टर पॅरेंटिंगचा परिणाम मुलाच्या विकासावर होतो. मुलांना कौशल्य विकसित करता येत नाही. पालक मुलांच्या प्रत्येक समस्या सोडवतात त्यामुळे मुलांवर स्वतःहून ती समस्या सोडण्याची कधीच वेळ येत नाही
हेलीकॉप्टर पॅरेंटिंग मागे काही कारणं असू शकतात. यात मुलांच्या भविष्याची चिंता, कॉलेज आणि परीक्षेत चांगले गुण, मनासारखे कॉलेज.मुलांची संगत असे अनेक कारणं असू शकतात.
अशा मुलांना त्यांच्या पालकांची सवय होते आणि ते स्वत: पुढे कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. मुले स्वतःची बाजू मांडू शकत नाहीत. त्यामुळे अनेक वेळा ते मागे राहतात.
हेलीकॉप्टर पॅरेंटिंगमुळे मुलांच्या मनात पालकांबद्दल वाईट विचार येऊ शकतात. आपले पालक आपल्याला कैद करून ठेवत आहेत असा विचार मुलांच्या मनात येऊ शकतो.
अशी मुलं जबाबदाऱ्यांपासून दूर पळू लागतात. कारण त्यांनी कधीच स्वतःहून कोणतेही काम केलेले नसते. ते कायम अवलंहून राहतात.