मुंबई, 24 जून : प्रेमात (Love) काही तरुण इतके वेडे असतात की काहीही करतात. काही तरुण तर मुलींना (Love video) पटवण्यासाठी हद्दच गाठतात. आपल्या आवडत्या तरुणीला काही करून आपली करण्यासाठी ते अतोनात प्रयत्न करतात. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्याने चक्क तरुणीकडून किस (Kiss video) हवी म्हणून रस्त्यावरच ठिय्या मांडला.
आपाआपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर ठिय़्या आंदोलन केल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण या तरुणानेही आपली मागणी पूर्ण व्हावी म्हणून असाच ठिय्या (Boy demand kiss from girl on road) मांडला. पण त्याची की मागणी सरकार किंवा प्रशासनाकडे नाही. तर एका सुंदर तरुणीकडे होती आणि ही मागणी म्हणजे किस. पप्पी दे म्हणत पठ्ठ्याने रस्त्यावर ठिय्या मांडला. रस्त्यावरच तो बसला. पण यापेक्षा ज्या तरुणीकडून तो किस मागत होता. त्या तरुणीने जे केलं ते यापेक्षाही शॉकिंग आहे.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता एक तरुण रस्त्यावर झोपला आहे. रस्त्यावर ड्रामा करताना दिसतो आहे. त्याच्या आजूबाजूला बरेच लोक जमा झाले आहेत. समोर दोन तरुणीही आहेत.
हे वाचा - बायकोच्या ओठाऐवजी भलतीकडेच KISS; कपलचा एक्सरसाइझ VIDEO पाहून हसू आवरणार नाही
या व्हिडीओतील संवाद तुम्ही नीट ऐकला. तर तरुण तरुणीकडून किस मागताना दिसतो आहे. एक तरुणी त्याला किस दिल्यानंतर तू जाशील ना, असं विचारते. तरुण हो म्हणतो आणि पप्पी दे, पप्पी दे म्हणत राहतो. त्यावेळी ज्या तरुणीकडून हा तरुण किस मागत असतो, ती त्या तरुणाजवळ जाते. सुरुवातीला तुझं तोंड फोडेन असं म्हणते. पण दुसऱ्याच क्षणी त्याचा गाल आपल्या हातात धरते आणि त्याच्या गालावर किस करते.
तरुणीने पप्पीसाठी ठिय्या मांडलेला पाहून जितकं हसू येतं. त्यापेक्षा कितीतरी मोठा धक्का तरुणीला त्याला किस पाहताना बसतो. तरुणी असं काही करेल अशी कल्पना आपल्याला हा व्हिडीओ पाहताना किंचितही येत नाही. तरुणी या तरुणाला आता चांगलाच चोप देईल असंच वाटतं. पण घडतं काही भलतंच. तरुणीने जे केलं ते पाहून तुम्हा-आम्हाला जसा धक्का बसला तसाच या तरुणासाठीही होता, पण आपल्यासाठी शॉकिंग तर या तरुणासाठी हा सुखद धक्का होता. तरुणीने त्याची मागणी पूर्ण करताच त्याच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येतो. जणू काही आपण एक मोठी लढाईच जिंकली, असेच हावभाव या तरुणाच्या चेहऱ्यावर आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला जमा झालेले लोकही अगदी या तरुणाने मोठा विजय मिळवला अशा उत्साहात ओरडताना दिसत आहेत.
हे वाचा - ना कार्ड, ना पिन, फक्त दरवाजा उघडा; ATM सारखे धडाधड पैसे देते ही कार; पाहा VIDEO
jaat_k_jokes या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा मजेशीर आणि शॉकिंग व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Funny video, Love, Relationship, Viral, Viral videos