मराठी बातम्या /बातम्या /Viral /ना कोणतं कार्ड, ना पिन; फक्त दरवाजा उघडताच ATM सारखे धडाधड पैसे देते ही कार; विश्वास बसत नाही तर VIDEO पाहा

ना कोणतं कार्ड, ना पिन; फक्त दरवाजा उघडताच ATM सारखे धडाधड पैसे देते ही कार; विश्वास बसत नाही तर VIDEO पाहा

पैशांच्या कारचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

पैशांच्या कारचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

पैशांच्या कारचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

मुंबई, 24 जून : एटीएममध्ये (ATM) आपण जेव्हा कार्ड आणि पिन टाकतो, त्यानंतर त्यातून धडाधड नोटा (Money) बाहेर येतात. असं एखादं कार्ड किंवा पिन नसणारं पैशांचं मशीन असतं तर... किंवा पैशांचा झाड, पैशांचा पाऊस पडला असता तर... असा विचार प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी तरी आला असेलच. पैशांचं झाड किंवा पैशांचा पाऊस नाही पण अशीच अगदी सहजपणे पैसे देणारी कार मात्र (Money in car) सापडली आहे.

पैशांच्या कारचा (Cash in car) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. या कारमध्ये इतके पैसे भरले आहेत की याला कार कम एटीएम म्हटलं तरी हरकत नाही. या पैशांच्या कारचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

व्हिडीओत सुरुवातील पाहून शकता. कारच्या सुरुवातीच्या भागावर काचेतून पैसेच पैस दिसत आहे. कदाचित हे पैसे कारच्या ग्लासवर चिकटवलेले असावेत असं वाटतं.

हे वाचा - बायकोच्या ओठाऐवजी भलतीकडेच KISS; कपलचा एक्सरसाइझ VIDEO पाहून हसू आवरणार नाही

पण कॅमेरा जेव्हा कारच्या जवळ जातो. तेव्हा समजतं की ही संपूर्ण कारच पैशांनी भरलेली आहे. कारमध्ये पैशांच्या नोटा खचाखच भरलेल्या आहेत. कारमध्ये ना ड्रायव्हर आहे ना, प्रवासी... एकही व्यक्ती नाही तर फक्त नोटा... नोटा... आणि नोटाच.

एक व्यक्ती या कारचा दरवाजा उघडते आणि कारमधील नोटा धडाधड जमिनीवर कोसळतात. एटीएममधून जसे पैसे बाहेर पडावेत, तसे या कारमधून बाहेर पडले. फरक इतकात की इथं तुम्हाला कोणत्याही कार्डची किंवा पिनची गरज पडली नाही. तर फक्त दरवाजा उघडतात इतक्या प्रमाणात नोटा मिळाल्या आहेत.

हे वाचा - 'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल

व्हिडीओ पाहूनच धक्का बसतो. पण इतके पैसे पाहून साहजिकच मनालाही एक वेगळाच आनंद मिळतो. ही अवस्था फक्त तुमचीच नाही तर हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येक सोशल मीडिया युझर्सची आहे. hepgul5 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटिझन्सना हा व्हिडीओ खूपच आवडत आहे, त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंटही येत आहेत.

First published:

Tags: Car, Money, Shocking viral video, Viral, Viral videos