• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • हाडं मजबूत करतात हे 6 पदार्थ; संधिवात, फ्रॅक्चर, कॅन्सरची राहणार नाही भीती

हाडं मजबूत करतात हे 6 पदार्थ; संधिवात, फ्रॅक्चर, कॅन्सरची राहणार नाही भीती

हाडं मजबूत करण्यात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावतात.

हाडं मजबूत करण्यात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावतात.

उतारवयात हाडांच्या दुखण्यामुळे औषधं (Medicine) खायची नसतील तर, वेळीच खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला हवं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 ऑगस्ट :  हाडं मजबूत (Strong Bons) असतील तर, आपलं शरीर मजबूत (Strong Health) आहे असं आपणं म्हणू शकतो. कारण, कमजोर हाडं (Weak Bone) दुखायला लागतात. थोडसं लागलं तरी तुटण्याची शक्यता असते. त्यामुळेच हेल्दी लाईफ (Healthy Life) जगण्यासाठी इतर अयवांबरोबर हाडांसाठीही चांगला आहार (Good Diet) घ्यायला हवा. तरुण वयात आपली हाडं मजबूत असतात पण, वायानुसार हाडं कमजोर व्हायला लागतात. त्यामुळे उतारवयात हाडांच्या दुखण्यामुळे औषधं (Medicine) खायची नसतील तर, वेळीच खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायाला हवं. काही पदार्थ खाल्ल्यामुळे हाडा विकास (Bone Development) होऊन ते आयुष्यभर मजबूत राहण्यासाठी मदत होते. आरोग्य तज्ज्ञांच्यामते हाड कमजोर झाली तर, संधिवात. फ्रॅक्चर होणं, रिकेड्स कॅन्सर किंवा हाडांचं इन्फेक्शन (Bone Infection) या सारखे त्रास व्हायला लागतात. यामुळेच खाण्याकडे लक्ष द्यायला हवं. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हाडं मजबूत करण्यात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावतात. कॅल्शियम हाडांना मजबूत करतं तर, व्हिटॅमिन डी शरीरामध्ये कॅल्शियमच्या शोषणात मदत करतं. त्यामुळेच हे दोन्ही घटक असणारे पदार्थ खायला हवेत. (सावधान! पावळ्यात डेंग्यूचा धोका वाढला; ही लक्षणं दिसल्यास त्वरित करा ‘हे’ उपाय) अंडं अंड्यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतं. अंडं खाल्ल्यामुळे शरीरातली प्रोटीनची गरज पूर्ण होते आणि त्यामुळे हाडं मजबूत होतात. फॅटी फिश फॅटी फिशमध्ये फॅट्स आणि ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असतं. शरीरात व्हिटॅमिन डीची गरज पूर्ण करण्यात मदत करतो ओमेगा 3 आणि व्हिटॅमिन डी दोन्ही झाडांना मजबूत आणि रोगमुक्त ठेवण्यास मदत करतात. (ऑनलाईन अभ्यासामुळे डोळे होतील खराब; अशी घ्या मुलांची काळजी) ड्रायफ्रूट हाडांच्या मजबुतीसाठी अक्रोड, काजू, बदाम, ब्राझील नट्स खायला हवेत. यामध्ये कॅल्शियम,प्रोटीन, अ‍ॅन्टिऑक्सिडंट, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, फॉस्फरस सारखे घटक असतात. पालक हाडं मजबूत ठेवण्यासाठी पालक देखील खाऊ शकता. पालकामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे हाडं चांगली राहतात. (काळी अंथरुणामधून उठतांना येत असेल चक्कर तर, घातक आजाराचे आहेत संकेत) नाचणी नाचणीमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे हाडं मजबूत होऊन फ्रॅक्चर धोका कमी होतो. उष्णता कमी करण्यासाठी देखील नाचणी उपयोगी आहे. राजगिरा आणि तीळ राजगिरा ऐमारैन्थ कॅल्शिअम आणि फॉस्फरस स्रोत आहे. तीळ कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशियमची आवश्यकता पूर्ण करतं.
  Published by:News18 Desk
  First published: