जास्त दुर्लक्ष केल्यास डेंग्यु हेमोरॅजिक फिव्हर (Hemorrhagic Fever) किंवा डीएचएफचं (DHF) रूप धारण करू शकतं. ज्यामुळे जास्त रक्तस्त्राव किंवा ब्लड प्रेशर खाली येण्याने मृत्यूही होऊ शकतो.
भारत ,चीन, अफ्रिका, तायवान आणि मेक्सिको सारख्या देशांसह जगभारातल्या 100 देशांमध्ये डेंग्युचे रुग्ण आढळतात. डेंग्यु हे डासांमुळे होणारं व्हायरल इन्फेक्शन आहे.
2/ 8
यात तीव्र ताप, डोकेदुखी,अंग आणि सांधेदुखी,त्वचेर पुरळ येणं अशी लक्षणं दिसतात. एडीस डासाची मादी चावल्यामुळे हा त्रास होतो. उलट्या होणे, मळमळ येणे, डोळ्यांमध्ये वेदना, ग्लॅन्ड्समध्ये सूज येणं अशी लक्षणं दिसतात.
3/ 8
डेंग्यु हा फ्लेविविरीडे प्रजातीतला एक व्हायरस आहे. डेंग्युचे विषाणू 10 दिवसांपेक्षा जास्त काळ जगत नाहीत. डेंग्यु नॉर्मल किंवा गंभीर स्वरुपाचा असतो. डेग्युचा संसर्ग झाल्यास, त्याची लक्षणं 4 ते 5 दिवसांत दिसू लागतात.
4/ 8
ओटीपोटात तीव्र वेदना, सतत उलट्या होणे, हिरड्या किंवा नाकातून रक्तस्त्राव होणे, लघवीतून रक्त येणे, किंवा उलटीत रक्त येणे,, श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा जाणवणे, चिडचिडेपणा किंवा अस्वस्थता ही डेंग्युची गंभीर लक्षणं असतात.
5/ 8
डेंग्युची लक्षणं दिसत असतील तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. कंप्लीट ब्लड टेस्ट करा. प्लेटलेट्स काऊंटनुसार डॉक्टर उपचार सुरु करतील.
6/ 8
डेंग्यू एनएस 1 एजीसाठी एलिसा टेस्ट करावी. या ब्लड टेस्टमध्ये व्हायरल ऍटीजेनची माहिती मिळते. सुवातीच्या लक्षणांमध्ये पीसीआर टेस्ट करावी. सीरम आयजीजी आणि आयजीएम टेस्ट करा. त्याने शरीरातील ऍन्टीबॉडीजची लेव्हल समजेल.
7/ 8
भरपूर पाणी प्या. ओआरएस लिक्वीड प्या.जेवणाची विशेष काळजी घ्या. सूप,काढा,नारळ पाणी,डाळिंब यांचं जास्तीतजास्त सेवन करा,खिचडी आणि लापशी खा.
8/ 8
पावसाळ्यात डेंग्यूपासून संरक्षण व्हावं यासाठी काळजी घ्या. घराभोवती पाणी साठू देऊ नका. कुलर मधलं पाणी बदलत रहा. पाणी झाकून ठेवा कारण डास त्या ठिकाणी अंडी घालतात. मच्छरदानीचा उपयोग करा.