Baby Planning करताना रोजच्या सवयी बदला; गर्भधारणेपासून आई होण्याचा प्रवास होईल सुखकर
बाळाचा विचार करणाऱ्या पतीपत्नीने खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावं. काही पदार्थ खाण्याची सवय नसली तरी फर्टिलिटी वाढवण्यासाठी (Boost Fertility) आहारात त्यांचा समावेश करावा.
लग्नानंतर बाळाचं प्लॅनिंग करणाऱ्या जोडप्यांना कधीकधी गर्भधारणा होण्यात अडचणी येतात. तज्ज्ञांच्यामते आई-वडील होण्याचा निर्णय घेताना आधी फर्टाईल डेज आणि हेल्दी वाजनाबरोबर काही सप्लीमेन्ट घ्यायला सुरुवात केली पाहिजे. याशिवाय फर्टिलिटी वाढवणारा आहार देखील घेऊ शकता.
2/ 9
संशोधनानुसार आहार आणि फर्टिलिटी यांचा जवळचा संबंध असतो. नॅश्नल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार तांदूळ, भाजी आणि मासे महिला आणि पुरुष दोघांमध्ये फर्टिलिटी वाढू शकतात. याशिवाय अल्कोहोल, कॅफिन, साखर हे पदार्थ महिला आणि पुरुषांच्या फर्टिलिटीवरती परिणाम करतात.
3/ 9
बीट, शिमला मिरची सारख्या भाज्या फर्टिलिटी वाढवण्यामध्ये मदत करतात. आंबट फळं, पालेभाज्या देखील स्ट्रेस कमी करतात, फॉलिक अॅसिड वाढवतात. फर्टिलिटी वाढवण्यासाठी आणि बाळाच्या विकासाकरता या भाज्या खायला हव्यात.
4/ 9
डॉक्टरांच्यामते आहारात हाय प्रोटीन डाएट घ्यायला हवा. यासाठी स्प्राऊट, सोयाबीन, पनीर, डाळ, बीन्स, अंड्याचा सफेद भाग, मासे, चिकन खायला हवं. बॅलन्स डाएट घेतल्यामुळे व्हिटॅमिन, अॅन्टीऑक्सिडन्ट आणि मिनरल्स मिळतात.
5/ 9
बाळाचं प्लॅनिंग करताना दोघांनीही ड्रायफ्रूट्स खायला सुरूवात केली पाहिजे. ड्रायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणात अॅन्टीऑक्सिडन्ट असतात. त्यामुळे शरीरामध्ये रिअॅक्टिवे ऑक्सिजन स्पीशीज केमिकल कमी होतं हे केमिकल फर्टिलिटीवर परिणाम करत असतं.
6/ 9
वाढलेलं वजन फर्टिलिटीवर परिणाम करतं. ओवूलेशन सायकल वरती वाढलेल्या वजनाचा 5 टक्क्यांनी परिणाम होऊन ओवूलेशन कमी होतं. त्यामुळे डॉक्टरांच्यामते फर्टिलिटी वाढवण्यासाठी दिवसातून 3 वेळा जास्त जेवण्यापेक्षा 5 ते 6 वेळा प्रमाणात आहार घ्यावा.
7/ 9
पती किंवा पत्नी दोघांनी दिवसातून किमान पाऊण तास व्यायाम करायला हवा. याशिवाय भरपूर प्रमाणात पाणी प्यावं आणि व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर, डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लीमेंट सुरू कराव्यात.
8/ 9
बाळाचं प्लॅनिंग करताना शुगर लेव्हलवर लक्ष ठेवायला हवं. शरीरात साखर वाढली तर, डायबेटीसमुळे शुक्राणूंची कॉलिटी खराब होते. शुगर लेव्हल वाढत असेल तर, व्यायाम, आहार आणि औषधं घेऊन कंट्रोल करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे फर्टिलिटी वाढेल.
9/ 9
रेड मिट, चीज, लोणी, तळलेले पदार्थ, तूप, किंवा हाय कोलेस्ट्रॉल असलेले पदार्थ टाळावेत. मैदा, साखर यांचं प्रमाण कमी करावं. अल्कोहोल, स्मोकिंग बंद करावं, चपाती खाण बदं करून मल्टीग्रेनचा वापर करावा.