मुंबई, 30 जुलै : अनेकदा महिलांची तक्रार असते की त्यांना मासिक पाळी दरम्यान पोटदुखी आणि गॅसच्या समस्येला सामोरे जावे लागते. ही समस्या खरं तर हार्मोनल बदलांमुळे होते. हेल्थलाइननुसार, ही एक सामान्य समस्या आहे जी स्वतःच संपते, परंतु जर तुमच्या काही सवयी या समस्या वाढवण्याचे काम करू शकतात आणि समस्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. पाळीदरम्यान होणाऱ्या समस्या जसे की, डोकेदुखी, मूड बदलणे, पाठीच्या खालच्या भागात दुखणे या आणखी वाढतात. तुम्हालाही दर महिन्याला अशा काही समस्यांना सामोरे जावे लागत असेल, तर आम्ही तुम्हाला पीरियड्सदरम्यान ब्लोटिंगची समस्या कमी करण्यासाठी काय करता येईल ते सांगणार आहोत. मासिक पाळीदरम्यान होणारे ब्लोटिंग कसे नियंत्रित करावे स्वत:ला हायड्रेटेड ठेवा कधीकधी डिहायड्रेशनमुळे पोट फुगण्याची शक्यता असते. तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितके ते तुमच्यासाठी चांगले असेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही नारळपाणी, डाळिंबाचा रस हेदेखील पिऊ शकता.
Headaches pressure points : फक्त डोकं दाबून फायदा नाही; शरीराच्या ‘या’ भागांवर हलकासा टच आणि डोकेदुखीपासून मिळवा मुक्तीअल्कोहोल आणि कॅफिन टाळा अल्कोहोल आणि कॅफिनचे सेवन केल्याने पॉट फुगण्याची समस्या वाढू शकते. त्यामुळे या गोष्टींऐवजी पीरियड्समध्ये हेल्दी ड्रिंक्सचा आहारात समावेश करा. सकाळी चहा किंवा कॉफीऐवजी आल्याचा चहा, ग्रीन टी किंवा पुदिन्याचा चहा घ्या. व्यायाम आवश्यक तुमच्या पोटात गॅस तयार होत असल्यास थोडा वेळ चालल्याने तुम्हाला अराम मिळतो. जर तुम्ही नियमित व्यायाम केला तर तुम्हाला मासिक पाळी आणि ब्लोटिंगच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. तणाव टाळा तुम्ही खूप तणावाचा सामना करत असाल तर तुमच्या मासिक पाळीवरही त्याचा खूप परिणाम होतो. त्यामुळे शक्यतो तणाव टाळा आणि योगा, मेडिटेशन, मसाज इत्यादींच्या मदतीने तणावमुक्त रहा. धूम्रपान करणे टाळा तुम्हाला स्मोकिंगची सवय असली तरी मासिक पाळीच्यावेळी ब्लोटिंगसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे धूम्रपान करणे प्रकर्षाने टाळा.
वयाच्या 56 व्या वर्षी देखील ही महिला दिसते तरुण; कपाटात दडलंय तिच्या सौंदर्याचं रहस्यमीठ कमी प्रमाणात खा पीरियड्समध्ये महिलांना अनेकदा मसालेदार पदार्थ खायला आवडतात, पण जास्त मीठ असलेले पदार्थ तुमच्या समस्या आणखी वाढवण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत चिप्स, स्नॅक्स इत्यादींऐवजी निरोगी अन्नपदार्थ खावे.