जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / वयाच्या 56 व्या वर्षी देखील ही महिला दिसते तरुण; कपाटात दडलंय तिच्या सौंदर्याचं रहस्य

वयाच्या 56 व्या वर्षी देखील ही महिला दिसते तरुण; कपाटात दडलंय तिच्या सौंदर्याचं रहस्य

वयाच्या 56 व्या वर्षी देखील ही महिला दिसते तरुण; कपाटात दडलंय तिच्या सौंदर्याचं रहस्य

तुमच्या पोशाखात आणि स्टाइलमध्ये थोडा बदल करून तुम्हीसुद्धा स्वतःला वयस्कर दिसण्यापासून कसं रोखू शकता आणि कायम तरूण राहू शकता

    मुंबई, 29 जुलै:  वाढत्या वयाचा परिणाम चेहऱ्यावर दिसू नये, यासाठी अ‍ॅंटी एजिंग क्रीम वापरणं, स्नायूंचे व्यायाम करणं अशा हर तऱ्हेनं प्रयत्न केले जातात. ज्या व्यक्ती जास्त सतर्क असतात, त्या आहारात (Diet) बराच बदल करून स्वतःला फिट आणि निरोगी दाखवण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला कोणी वृद्ध म्हणू नये, ही त्यामागची भूमिका असते; पण एक महिला अशी आहे, की जिने केवळ एका युक्तीच्या जोरावर स्वतःचं तारुण्य  जपलं आहे. तिच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला तिच्या वयाचा अंदाजही लावता येणार नाही. 56 वर्षांच्या टिकटॉकर मेलिसा गेट्स यांनी त्यांचं तारुण्य या वयातही जपलं आहे. तुमच्या पोशाखात आणि स्टाइलमध्ये थोडा बदल करून तुम्हीसुद्धा स्वतःला वयस्कर दिसण्यापासून कसं रोखू शकता आणि कायम तरूण राहू शकता, याविषयी त्यांनी माहिती दिली आहे. तारुण्य जपण्याचं रहस्य कोणतंही अ‍ॅंटी एजिंग क्रीम किंवा ट्रीटमेंटमध्ये नाही तर ते तुमच्या कपाटात दडलेलं आहे, असं मेलिसा सांगतात. हेही वाचा - Friendship : या मित्रमैत्रिणी कधीच सोडणार नाहीत तुमची साथ; कोणती राशी तुमची बेस्ट फ्रेंड पाहा कपाटात दडलेलं तारुण्याचं रहस्य काढा बाहेर तरुण दिसण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. टिकटॉकर मेलिसा गेट्स त्यापैकीच एक होय. पेहराव आणि स्टाइलच्या जोरावर मेलिसा यांनी स्वतःला एवढं तरुण ठेवलं आहे, की त्यांना पाहून कोणीही अंदाज लावू शकत नाही, की त्या 56 वर्षांच्या आहेत. मेलिसा या गोष्टीशी संबंधित टिप्स वयस्कर व्यक्तींसोबत शेअर करतात. `वय रोखण्याचं रहस्य तुमच्या कपाटात दडलं आहे. त्यामुळे कपाट उघडून त्यातल्या विशिष्ट गोष्टी वापरणं गरजेचं आहे,` असं त्या सांगतात. त्यांच्या मते, कपडे आणि मेकअप (Makeup) तुमचं वय कमी दर्शवतात. त्यामुळे त्या स्वतः या गोष्टींचा वापर करतात आणि तरुण दिसतात. स्मार्ट दिसण्यासाठी करा पोशाखात थोडासा बदल मेलिसा सोशल साइट्सवर (Social Sites) त्यांची स्टाइल शेअर करत असतात. एका ठिकाणी त्यांनी रिप्ड जीन्ससह काळ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला होता. चमकदार पांढरे स्नीकर्स दाखवण्यासाठी तो रोल केला होता. त्यानंतर त्यांनी केसांवर गॉगल लावला. त्यानंतर मेलिसा यांनी या ड्रेससोबत एक काळी स्लिंग बॅग कॅरी केली होती. यानंतर त्यांचा लूक इतका बदलला, की त्यांना ओळखणंही मुश्किल झालं. त्यांची ही स्टाइल फॉलोअर्सनाही खूप आवडली आणि त्यांनी मेलिसा याचं कौतुकही केलं. काही फॉलोअर्सना तरुण दिसण्यासाठी त्यांनी केलेला पेहराव आवडला, तर काहींनी आपलं वय स्वीकारून त्याप्रमाणे राहावं, असा सल्ला दिला. `तुम्ही आहात, तशा खूप सुंदर आहात. पोशाख बदलण्याची गरज नाही. तुम्ही कसाही पेहराव करू शकता,` अशी कमेंट काही युझर्सनी केली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: lifestyle
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात