मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Headaches pressure points : फक्त डोकं दाबून फायदा नाही; शरीराच्या 'या' भागांवर हलकासा टच आणि डोकेदुखीपासून मिळवा मुक्ती

Headaches pressure points : फक्त डोकं दाबून फायदा नाही; शरीराच्या 'या' भागांवर हलकासा टच आणि डोकेदुखीपासून मिळवा मुक्ती

शरीराच्या विशिष्ट भागावर अ‍ॅक्युप्रेशर (Acupressure) किंवा प्रेशर पॉइंट (Pressure Points) तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळवून देण्यात मदत करतात.

शरीराच्या विशिष्ट भागावर अ‍ॅक्युप्रेशर (Acupressure) किंवा प्रेशर पॉइंट (Pressure Points) तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळवून देण्यात मदत करतात.

शरीराच्या विशिष्ट भागावर अ‍ॅक्युप्रेशर (Acupressure) किंवा प्रेशर पॉइंट (Pressure Points) तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळवून देण्यात मदत करतात.

मुंबई, 30 जुलै : धावपळीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अनियमित आहारामुळे बऱ्याचदा अनेकांना डोकेदुखीचा (Headache) त्रास होतो. डोकेदुखीचा त्रास होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. यात प्रामुख्याने पित्त होणं, सर्दी, खोकला होणं, डोळ्यांचे विकार आदींचा समावेश असतो. बऱ्याचदा ताण-तणावामुळेही (Stress) डोकेदुखीची समस्या जाणवते. डोकेदुखीचा त्रास फारसा गंभीर नसतो; मात्र दीर्घ काळ सातत्यानं डोकेदुखी जाणवत असेल, तर वैद्यकीय सल्ला आणि उपचारांची गरज भासू शकते. कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीला डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. तसंच वेदनांची तीव्रताही भिन्न असू शकते. काही जण डोकेदुखी जाणवू लागल्यावर ती आपोआप थांबेल या विचाराने कोणतेही उपचार घेत नाहीत. वारंवार जाणवणारा डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय (Home Remedies) करणं शक्य आहे. या उपायांमुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि समस्यादेखील लवकर दूर होते. डोकेदुखीचा त्रास नैसर्गिकरीत्या दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांसह अन्य काही उपाय शोधत असाल, तर अ‍ॅक्युप्रेशर (Acupressure) किंवा प्रेशर पॉइंट (Pressure Points) हा उपाय तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. शरीरातल्या काही भागांवरचे प्रेशर पॉइंट्स अतिसंवेदनशील मानले जातात. एखाद्या वेदनेमुळे शरीराला होणारा त्रास, अस्वस्थता कमी होण्यासाठी असे प्रेशर पॉइंट्स विशिष्ट क्रियेद्वारे उत्तेजित केले जातात. यामुळे आरोग्य सुधारतं, वेदना कमी होतात आणि शरीरक्रिया पूर्ववत होण्यास मदत होते. प्रेशर पॉइंट्स म्हणजे काय, डोकेदुखीची प्रमुख कारणं कोणती? डोकेदुखीवर प्रेशर पॉइंट्सचे उपचार कसे फायदेशीर ठरतात, याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊ या. डोकेदुखीची प्रमुख कारणं काही सर्वसामान्य कारणांमुळे किंवा ट्रिगर्समुळे (Triggers) डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. हॉर्मोनल चेंजेस (Hormonal Changes) हे त्यातलं प्रमुख कारण म्हणता येईल. महिलांना या कारणामुळे डोकेदुखीचा त्रास जाणवण्याची शक्यता अधिक असते. मासिक पाळीदरम्यान हॉर्मोनल चेंजेस झाल्यामुळे डोकं दुखणं हे कॉमन समजलं जातं. काही विशिष्ट औषधांचं सेवन डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरतं. शारीरिक, मानसिक, भावनिक ताण-तणावामुळे एखाद्या व्यक्तीस तीव्र स्वरूपात डोकेदुखी जाणवू शकते. अल्कोहोल, कॉफी अधिक प्रमाणात घेतल्यामुळे किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळेही डोकेदुखीचा त्रास होतो. ऋतुबदलाच्या काळात विषम हवामानामुळेही डोकेदुखी जाणवते. सर्दी, सायनुसायटिसमुळेही हा त्रास होतो. पारंपारिक चायनीज उपचार पद्धती असलेल्या अ‍ॅक्युप्रेशर किंवा प्रेशर पॉइंट्स उपचारपद्धतीच्या साह्याने डोकेदुखीवर मात करणं अगदी सहज शक्य आहे. हे वाचा - Blood pressure for children : लहान मुलांनाही असते का ब्लड प्रेशरची समस्या; त्यांच्या बीपीचं प्रमाण काय? अ‍ॅक्युप्रेशर शरीरातला तणाव कमी करण्याचं काम करतं. तसंच डोकेदुखी कमी करण्यासाठी आणि ती त्वरित दूर करण्यासाठी हे उपचार फायदेशीर ठरतात. पारंपारिक चायनीज वैद्यकशास्त्रानुसार, अ‍ॅक्युप्रेशर तुमच्या शरीरातला ऊर्जेचा प्रवाह संतुलित करतं. आधुनिक विज्ञानानुसार, अ‍ॅक्युप्रेशर प्रामुख्याने स्नायूंवरचा ताण कमी करून रक्ताभिसरणाची क्रिया वाढवतं. तसंच शरीरातलं एंडॉर्फिन वाढवण्याचं कार्य करतं. डोकेदुखीच्या अनुषंगानं विचार करता, शरीराच्या विशिष्ट भागांवर योग्य पद्धतीनं दाब दिल्यास डोकेदुखी नक्की नियंत्रणात येते. डोकेदुखी बरी होण्यासाठी सर्वोत्तम प्रेशर पॉइंट्स 1. युनियन व्हॅली प्रेशर पॉइंट (Union Valley Pressure Point) – हात, पाय आणि इतर भागांवर डोकेदुखी बरी करण्यासाठीचे प्रेशर पॉइंट्स असतात. यापैकी एक पॉइंट तुमच्या हाताची तर्जनी आणि अंगठ्यामध्ये असतो. या मांसल भागावर दुसऱ्या हाताचा अंगठा किंवा तर्जनीनं 10 सेकंद हलका मसाज केला किंवा थोडा दाब दिला तर डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. तसंच या पॉइंटवर दाब दिल्यास किंवा मसाज केल्यास दातदुखी, मानदुखी (Neck Pain) आणि संधिवातामुळे होणाऱ्या वेदनाही कमी होतात. 2. द थर्ड आय प्रेशर पॉइंट (The Third Point Pressure Point) – दोन्ही भुवयांच्या मध्यभागी, नाकावरचा हा प्रेशर पॉइंट अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या पॉइंटवर दाब दिल्याने केवळ डोकेदुखीच नाही, तर सायनसशी संबंधित समस्याही दूर होतात. डोळे, चेहरा आणि डोक्याभोवती असलेला ताण कमी होण्यास मदत होते. हाताच्या तर्जनीने या भागावर एक मिनिट दाब दिल्यास डोकेदुखी कमी होऊ शकते. 3. ब्राइट लाइट प्रेशर पॉइंट्स (Bright Light Pressure Point) – डोकेदुखी आणि सायनसचा त्रास कमी होण्यासाठी ब्राइट लाइट प्रेशर पॉइंट्स महत्त्वाचे ठरतात. हे पॉइंट्स भुवयांच्या अगदी खाली असतात. दोन्ही हाताच्या तर्जनीने या पॉइंट्सवर 10 सेकंद दाब द्यावा. काही मिनिटं थांबून पुन्हा ही क्रिया केल्यास डोकेदुखी थांबण्यास मदत होते. 4. नाकाजवळचे प्रेशर पॉइंट्स – चेहऱ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असणारे हे प्रेशर पॉइंट्स डोकेदुखी थांबवण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. हे प्रेशर पॉइंट्स नाकपुडीजवळ, गालांच्या हाडाखाली आणि डोळ्यांशी जोडलेले असतात. या पॉइंट्सवर एका मिनिटाच्या अंतरानं काही वेळ दाब दिल्यास नक्कीच फायदा होतो. 5. नेक प्रेशर पॉइंट्स (Neck Pressure Point) – मानेच्या स्नायूंवर ताण आल्यास डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. हे पॉइंट्स कान आणि मणक्याच्या मध्यावर मानेच्या खाली असतात. दोन्ही हाताची तर्जनी आणि मधल्या बोटाच्या सहाय्यानं या भागावर 10 सेकंद दाब दिल्यास मानदुखी, डोकेदुखी कमी होते. 6 . पायावरचे प्रेशर पॉइंट्स (Pressure Point On Leg) – पायांमधले प्रेशर पॉइंट्स डोकेदुखीचा त्रास कमी करू शकतात. हे पॉइंट्स अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटाच्या मध्यभागी थोडेसे खालच्या बाजूला असतात. या पॉइंटवर हलका मसाज केल्यास, तसंच एका मिनिटापर्यंत दाब दिल्यास डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. हे वाचा - Cholesterol चांगलं की वाईट कसं ठरतं? बॅड कोलेस्टेरॉल वाढलं तर काय करायचं? प्रेशर पॉइंट्स उपचाराबाबत अद्याप सखोल संशोधन झालेलं नाही. परंतु, ही एक सुरक्षित उपचारपद्धती मानली जाते. हे उपाय करूनही डोकेदुखीचा त्रास कमी होत नसेल तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला, तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Health, Lifestyle, Pain

पुढील बातम्या