Home /News /lifestyle /

बायको इतकी स्वच्छ राहते की वैतागला नवरा; म्हणे, 'मला घटस्फोट हवा'

बायको इतकी स्वच्छ राहते की वैतागला नवरा; म्हणे, 'मला घटस्फोट हवा'

साफसफाईच्या नावाने बायकोने नवऱ्याचा लॅपटॉप आणि मोबाईलही धुतला.

    बंगळुरू, 02 डिसेंबर : स्वच्छता (Hygiene) राखणं ही चांगली सवय. शाळेपासूनच आपल्याला स्वच्छतेचे (Hygiene habits) धडे दिले जातात. कोरोना काळात तर आपल्याला स्वच्छतेचं महत्त्व अधिक चांगल्या पद्धतीने समजलं. पण एका महिलेने तर साफसफाईच्या नावाने चक्क लॅपटॉप आणि मोबाईल फोनही धुवून टाकले आहेत. बायकोच्या या अति स्वच्छतेच्या सवयीला तिचा नवराही वैतागला आहे. त्याने घटस्फोटाचीच मागणी केली आहे (Husband want divorce due to wifes hygiene habits). बंगळुरूत (Bengaluru) राहणारे संध्या आणि गिरीश (नाव बदललेलं) याचं लग्न 2009 साली झालं. लग्नानंतर नोकरीच्या निमित्ताने हे कपल इंग्लंडमध्ये गेलं. तेव्हा सर्व ठिक होतं. पण नंतर परिस्थिती बिघडत गेली. संध्याला स्वच्छतेची इतकी सवय लागली की घरातील प्रत्येक वस्तू ती साफ करू लागली आणि इतरांनाही तसंच करण्यास भाग पाडू लागली. तिच्या या विचित्र सवयीचा घरातील इतर सर्वांनाही त्रास होऊ लागला. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार  या कपलचं प्रकरण हाताळणाऱ्या बंगळुरू शहर पोलिसातील सीनियर काऊंसल बीएस सरस्वती यांनी सांगितलं की, लग्नानंतर दोन वर्षांनी पहिलं मूल झाल्यानंतर या कपलमधील परिस्थिती अधिक बिघडू लागली. कामावरून घरी येताच बायको नवऱ्याला दररोज बूट, कपडे आणि मोबाईल स्वच्छ करायला जबरदस्ती करायची. त्यामुळे नवरा कंटाळला होता. हे वाचा - OMG! कपड्यांप्रमाणे बदलते नवरे, 11 वेळा केलं लग्न; आता शोधतेय बारावा पती रिपोर्टनुसार संध्याला ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर (OCD) असल्याचं सांगितलं जातं आहे. हा एक मानसिक आजार आहे. या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती कोणतंही काम भीतीने किंवा आवेशाने वारंवार करत राहते. ब्रिटनहून पुन्हा भारतात परतताच या कपलने काऊन्सिलिंगची मदत घेतली आणि परिस्थिती सुधरू लागली. त्यानंतर या दाम्पत्याने आणखी एका मुलाला जन्म दिला. कोरोना आल्यानंतर संध्याची ओसीडीची समस्या अधिक वाढली. घरातील प्रत्येक वस्तू ती स्वच्छ आणि सॅनिटाइझ करू लागली. सरस्वती यांनी सांगितलं की, लॉकडाऊनदरम्यान पती घरीच काम करत होता आणि पत्नीने त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल फोनही धुतला. पतीने दिलेल्या तक्रारीनुसार ती दिवसातून सहा पेक्षा जास्त वेळा अंघोळ करते आणि अंघोळीचा साबण स्वच्छ करायलाही वेगळा साबण वापरते. दीर्घकालीन आजारामुळे गेल्यावर्षी संध्याच्या आईचं निधन झालं. त्यानंतर तिने नवरा आणि मुलांना जबरदस्ती घराबाहेर काढलं आणि तब्बल 30 दिवस ती साफसफाई करत होती. काऊन्सलरनी सांगितलं की, जेव्हा पत्नीने मुलांनाही शाळेतून दररोज घरी परतल्यानंतर युनिफॉर्म आणि बूट धुवायला लावले तेव्हा नवऱ्याला राग अनावर झाला. त्यानंतर तो आपल्या मुलांना घेऊन आपल्या आई-वडिलांच्या घरी गेला. त्यानंतर पत्नी पोलिसांकडे पोहोचली. हे वाचा - या व्यक्तीने दिली इतकी मोठी ढेकर की झाला World Record; आवाज ऐकूनच हादराल अखेर बायकोच्या अति स्वच्छतेच्या सवयीला वैतागून नवऱ्याने घटस्फोट मागितला आहे. पतीने आपण जे करत आहोत ते असामान्य असल्याचं म्हणताच पत्नीही आता त्याच्याविरोघात तक्रार करण्याचा विचार करत आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bengaluru, Couple, Divorce, Lifestyle, Relationship, Wife and husband

    पुढील बातम्या