मुंबई, 02 डिसेंबर : कुणाशी मैत्री (Friendship) करायची म्हणजे आपण हात मिळवतो करतो किंवा आलिंगन देतो. पण एकमेकांच्या तोंडात उलटी करून मैत्री केल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? (Vomit into Each others Mouth for friendship) वाचूनच तुम्हाला किळसवाणं वाटलं ना? अशी विचित्र पद्धतीने मैत्री कोण करेल असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर एक असा जीव आहे, तो या पद्धतीने मैत्री करतो.
माणसांप्रमाणे प्राणी-पक्ष्यांमधीलही मैत्री तुम्ही पाहिली असेल. अगदी कीटकही याला अपवाद नाही. आपल्या नेहमी पाहत असलेल्या कीटकांपैकी एक म्हणजे मुंगी. मुग्याही एकमेकांशी मैत्री करतात आणि एकमेकांच्या तोंडात उलटी करून मैत्री कऱण्याची पद्धत ही कोणत्या माणसांमध्ये नाही तर या मुग्यांमध्ये आहे (Ants Vomit into Each others Mouth).
मुंग्यांच्या शरीराचे तीन प्रमुख भाग असतात. पहिला भाग फोरगट (Foregut), दुसरा भाग मिडगट (Midgut) आणि तिसरा भाग हाइंडगट (Hindgut). फोरगट तोंडापासून पोटापर्यंत सुरुवातीच्या भागाला म्हणतात. पोटापासून आतड्यांपर्यंत मिडगट आणि आतड्यांपासून मलद्वारापर्यंत हाइंडगट असतो.
हे वाचा - अजबच! कोणतं ब्युटी प्रोडक्ट्स नाही; 'थप्पड' आहे कोरिअन महिलांच्या सौंदर्याचा राज
फोरगट भाग म्हणजे त्यांचा सामाजिक पोट असतं. या पोटाता वापर त्या मैत्री वाढवण्यासाठी आणि माहिती जमा करण्यासाठी करतात. फोरगटमधील उलटी त्यांची सामाजिक मैत्री वाढवण्यात मदत करते. त्यामुळे त्या एकमेकांच्या तोंडात उलटी करतात. या प्रक्रियेला ट्रॉफॅलॅक्सिस (Trophallaxis) म्हटलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Friendship, Lifestyle, Other animal, Relationship