मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

OMG! शिजवायला गेली अंडं पोळून निघाला चेहरा; ऑनलाईन रेसिपी फंडा पडला महागात

OMG! शिजवायला गेली अंडं पोळून निघाला चेहरा; ऑनलाईन रेसिपी फंडा पडला महागात

ऑनलाइन व्हिडीओ पाहून तिनं नेहमी बनवत असलेल्या रेसिपीमध्ये थोडासा बदल केला आणि तोच तिला भारी पडला.

ऑनलाइन व्हिडीओ पाहून तिनं नेहमी बनवत असलेल्या रेसिपीमध्ये थोडासा बदल केला आणि तोच तिला भारी पडला.

ऑनलाइन व्हिडीओ पाहून तिनं नेहमी बनवत असलेल्या रेसिपीमध्ये थोडासा बदल केला आणि तोच तिला भारी पडला.

  • Published by:  Priya Lad

ब्रिटन, 14 जुलै :  ब्युटी असो, फॅशन असो, स्टाइल असो, डान्स असो किंवा रेसिपी (Recipe video) आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल किंवा येत असली तरी त्यात आणखी काही तरी नवीन करायचं असेल तर ऑनलाइन व्हिडीओचा (Online video) पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. बऱ्याच तरुणी महिला ज्यांनी स्वयंपाकघराचं कधी तोंडही पाहिलेलं नसतं त्या ऑनलाइन व्हिडीओ  पाहून स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करतात. पण हा प्रयत्न यशस्वी होईलच असं नाही किंबहुना तो उलटही पडू शकतो. ऑनलाइन व्हिडीओ पाहून पदार्थ बनवणं ब्रिटनमधील एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे.

बोल्टनमध्ये (Bolton) राहणारी 25 वर्षांची चँटल (Chantelle)  टिकटॉकवर ट्रेंड (Trending on TikTok) होणारी पोचड एगची (Poached Egg) रेसिपी (Poached egg hack) पाहिली. आता सोशळ मीडियावर काही ट्रेंड होत असेल तर काही तरी नवीन करून पाहण्याचा नेटिझन्सचा प्रयत्न असतोच. या महिलेनंसुद्धा ही रेसिपी ट्राय करण्याचा प्रयत्न केला.

हे वाचा - तरुण नाहीच पण भयानक दिसू लागली; 2 लाखांची क्रीम लावूनही चेहऱ्याची भयंकर अवस्था

पोचड एग बनवण्यासाठी पाणी उकळून त्यात अंड फोडून टाकलं जातं. त्यानंतर ते शिजवलं जातं. रंग बदलण्यानंतर अंडं चमच्याने पाण्यातून बाहेर काढलं जातं. महिलेनं सांगितलं की, ती गेल्या दोन वर्षांपासून पोचड एग मायक्रोवेव्हमध्ये बनवत (Poached egg in microwave) होती. पण तिने गेल्या आठवड्याच टिकटॉकवरील व्हिडीओ पाहून तशा पद्धतीने पोचड एग बनवण्याचा प्रयत्न केला. पण आपण बनवत असलेल्या रेसिपीमध्ये ऑनलाइन पाहिलेल्या रेसिपीनुसार बदल करणं तिला चांगलंच महागात पडलं. तिचा चेहराच भाजला.

हे वाचा - अखेर रिअल टार्झन सापडलाच! आयुष्याची 41 वर्षे कसा जगला जंगलात पाहा

तिनं सांगितलं, तिनं अंडं फोडून पाण्यात टाकलं आणि 10 सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवलं. मायक्रोवेव्हमधून तिनं अंडं बाहेर काढलं आणि थंड चमच्याने अंड्याला भांड्यातून बाहेर काढायला गेली. तेव्हा भांड्यातील गरम पाणी थेट किचनच्या सीलिंगपर्यंत उडालं. त्यावेळी तिच्याचेहरा आणि मानेवरही उडालं आणि चेहरा भाजला. फक्त चे महिलेनं अंड बाहेर काढण्यासाठी थंड चमच्याचा वापर केला हीच तिची मोठी चूक होती. माहितीनुसार, तिच्यासोबत असं पहिल्यांदाच घडलं. यानंतर तिनं अंडं खायचंच नाही असं ठरवलं.

First published:

Tags: Britain, Easy hack, Lifestyle, Recipie, Viral, World news