जकार्ता, 13 जुलै : कोंबड्यांची अंडी (Hens Eggs) अनेकांना मनापासून आवडतात. परंतु मनुष्य अंडी देतो, असं तुम्ही कधी ऐकलंय का? एखादा मनुष्य अंडी (Boy Laid Eggs) देऊ शकतो, असं ऐकल्यावर तुम्ही क्षणभर पेचात पडाल. पण एका 14 वर्षीय मुलाने आपण अंडी देत असल्याचा दावा केला आहे. इंडोनेशियातून (Indonesia) एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. ‘मी कोंबडीप्रमाणे अंडी देतो,’ असा विचित्र दावा केला आहे इंडोनेशियातील अकमल नावाच्या मुलानं. या मुलाने मागील दोन वर्षांत 20 अंडी दिल्याचं त्याच्या पालकांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे त्याला रुग्णालयात तपासणीला नेलं असता त्यानं डॉक्टरांसमोर 2 अंडी देऊन त्यांनादेखील पेचात टाकलं आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, अकमलचा अंडी देण्याचा प्रकार पाहून डॉक्टरही (Doctors) आश्चर्यचकित झाले आहेत. कारण मानवी शरीरात अंड्यांची निर्मिती होण्यासारखी स्थितीच नसते. हे वाचा - बापरे! वर्षातले तब्बल 300 दिवस झोपतो पुरखाराम; कारण वाचून खिन्न व्हाल! इंडोनेशियाच्या दक्षिण सुलावेसी भागात राहणारा अकमल या समस्येवर उपचार करून घेण्यासाठी आपल्या पालकांसह Syech Yusuf Hospital मध्ये गेला. डॉक्टर त्याची शारीरिक तपासणी करत असताना त्याने डॉक्टरांसमोरही 2 अंडी दिली. डॉक्टरांनी जेव्हा या अंड्यांची तपासणी केली तेव्हा ती अंडी कोंबडीची असल्याचं स्पष्ट झालं. मात्र तो नैसर्गिकरित्या अशी अंडी कसा देऊ शकतो, यावर डॉक्टरांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. मानवी शरीरात अंड्यांची निर्मिती होणं अशक्य आहे. 2016 पासून अंडी देणाऱ्या अकमलने 22 फेब्रुवारी 2018 रोजी डॉक्टरांसमक्ष 2 अंडी दिली हे वाचा - Yuck! प्रेग्नन्सी सरप्राइझच्या नादात तिने नवऱ्याला चाखायला लावली आपली लघवी अकमलच्या पोटात अंडी येतात कुठून हा सर्वांत मोठा प्रश्न रुग्णालयातल्या डॉक्टरांसमोर आहे. या मुलाने मुद्दाम अंडी गिळली असावीत असा संशय डॉक्टरांना होता. परंतु, आपल्या मुलानं कधीही अंडी गिळलेली नाहीत, असं स्पष्टीकरण अकलमच्या वडिलांनी दिलं. अकमलची सोनोग्राफी (Sonography) केली असता, त्यात त्याच्या पोटात अंडी असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. अकमलने दिलेली अंडी जेव्हा फोडण्यात आली तेव्हा त्यातल्या काही अंड्यांमध्ये कोंबड्यांच्या अंड्यांप्रमाणेच पिवळा आणि काही अंड्यांमध्ये पांढरा पदार्थ असल्याचं आढळून आलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ही अंडी कोंबडीचीच आहेत; मात्र ती अकमलच्या पोटात कुठून येतात, हे कोडं अद्याप उलगडलेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







