तिरुवनंतपुरम, 13 जुलै : देशातील बहुतेक रुग्ण कोरोनातून बरे होत आहेत. तरी त्यांना कोरोना संसर्ग पुन्हा होण्याचा धोका नाही असं नाही. आता भारतातील सर्वात पहिल्या कोरोना रुग्णाला पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे (India's first corona patient positive again). देशात पहिला कोरोना रुग्ण सापडला होतो तो केरळात (Kerala medical student). या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट आता पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे.
चीनहून भारतात परतलेली केरळमधील वैद्यकीय विद्यार्थिनी भारतातील पहिली कोरोना रुग्ण होती. ती पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह झाली असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. तिला कोरोनाचा पुन्हा संसर्ग झाला आहे. तिची अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आहे पण आरटी-पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आहे. तिच्यामध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत, असं थ्रिसूरची डीएमओ डॉ. के. जे, रिना यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.
Kerala woman medical student, who was India's first COVID-19 case, has tested positive again, health authorities say. "She is reinfected with COVID-19. Her RT-PCR is positive, antigen is negative. She is asymptomatic," Thrissur DMO Dr K J Reena tells PTI.
— Press Trust of India (@PTI_News) July 13, 2021
चीनच्या वुहान युनिव्हर्सिटीत वैद्यकीय शिक्षण घेत असलेली ही विद्यार्थीनी जानेवारी, 2020 च्य शेवटच्या आठवड्यात भारतात परतली.
हे वाचा - तीन कोरोना लशी पुण्यातच तयार होणार; Serum Institute ची मोठी घोषणा
30 जानेवारी, 2020 रोजी तिला कोरोनाव्हायरसच असल्याचं निदान झालं. थ्रिसूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात तिच्यावर जवळपास तीन आठवडे तिच्यावर उपचार झाले, त्यानंतर ती कोरोनामुक्त झाली. कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतर 20 फेब्रुवारी, 2020 ला तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता जवळपास दीड वर्षांनंतर तिला पुन्हा कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona patient, Coronavirus