मुंबई, 25 ऑक्टोबर : दिवाळीनंतर साजरा होणारा सण, भाऊबीज भाऊ-बहिणीच्या मधुर नात्याचे प्रतीक आहे. हा सणही रक्षाबंधनासारखा थाटामाटात साजरा केला जातो. बहिणी भावाला तिलक लावून औक्षण करतात आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तर भाऊ बहिणीला कपडे किंवा पैसे भेट म्हणून देतात. पण काळाच्या ओघात भेटवस्तू देण्याची पद्धत खूप बदलली आहे. आता फक्त भाऊच नाही तर बहिणीही आपल्या भावांना भेटवस्तू देतात. या भाऊबीजेच्या दिवशी भाऊ आणि बहिणी एकमेकांना अशा भेटवस्तू देऊ शकतात जे त्यांच्यासाठी संस्मरणीय असतील. तसेच लहानपणीच्या जुन्या आठवणीही भेट म्हणून देता येतील. अशाच काही भेटवस्तूंबद्दल जाणून घेऊया.
Bhaubeej Rangoli : भाऊ-बहिणीचं सुंदर नातं दाखवा रांगोळीतून; खास भाऊबीज रांगोळी डिझाइनएकमेकांची गुपिते शेअर करा भाऊ-बहिणीत भांडण न होणे, शक्य नाही. विशेषत: लहानपणी मारामारी करणेदेखील भाऊ बहिणीच्या नात्याची सुंदरता दर्शवते. त्याचसोबत अनेक गुपिते आहेत जी भाऊ आणि बहिण स्वतःजवळ ठेवतात. मग भाऊबीजेच्या दिवशी तुम्ही एकमेकांशी तुमची सगळी गुपितं शेअर करू शकता आणि जुन्या मजेदार आठवणींना उजाळा देऊ शकता. या दिवसासाठी यापेक्षा सुंदर भेट कोणती असू शकते.
जुन्या फोटोंचा कोलाज बनवा भाऊ-बहिण दरवर्षी एकमेकांना कपडे आणि पैसे देतात, पण यावेळी जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी बालपणीच्या अनेक गमतीशीर किस्से फोटोंच्या रुपाने तुमच्याकडे उपलब्ध असतील. मोठे कोलाज करून हे फोटो एकमेकांना गिफ्ट करता येतात. ही भेट नेहमी डोळ्यांसमोर असेल तर नातं अधिक घट्ट होईल. इतरांना फोटोंशी संबंधित गोष्टी सांगतानाही मजा येईल.
Diwali 2022 : मिठाई कितीही खाल्ली तरी काही फरक पडणार नाही; फक्त खाण्याची पद्धत बदलाजुन्या शैलीत काढलेला फोटो मिळवा आजकाल थ्रोबॅक फोटो ट्रेंडमध्ये आहेत जे पुन्हा तयार केले जाऊ शकतात. री-क्रिएट म्हणजे लहानपणीचा फोटो पाहणे आणि त्याच शैलीत तो पुन्हा काढणे. लहानपणीचे किंवा जुने फोटो बघून प्रत्येकाला मजा येते. लहानपणी काढलेले मजेशीर फोटो तुम्ही या वयात रिक्रिएटी कर शकता. अशा भेटवस्तूची कल्पना आश्चर्यकारकपणे कार्य करेल.