कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. याच दिवसाला यमद्वितीया असंही म्हणतात. संपूर्ण भारतात भाऊबीज साजरी केली जाते. (Photo Credit : _the_alchemy_of_art_)
या दिवशी सुंदर पट्टभीवती सुंदर रांगोळी काढली जाते. त्यानंतर बहीण भावाचं औक्षण करून त्याला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करते. (Photo Credit : rangoli_by_nam)
भाऊबीजेला सहसा बहिणी किंवा मुली माहेरी येतात. पहाटे भावाला सुगंधी तेल, उटणं लावून स्नान घालतात. गोडाधोडाचा स्वयंपाक केला जातो. (Photo Credit : nishanti05)
बहिणीला येणं शक्य नसल्यास भाऊ तिच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी करतो. (Photo Credit : thegoodart_joekhattar)
दिवाळी शरद ऋतूत येते. त्यामुळे थोडीशी थंडी सुरू झालेली असते. दिवस लहान आणि रात्र मोठी व्हायला सुरुवात झालेली असते. (Photo Credit : hobbycaper)
भाऊबीजेला आकाशात चंद्रकोर पाहून आधी त्या चंद्रकोरीचं औक्षण करून मग भावाचं औक्षण करण्याची पद्धतही काही ठिकाणी आहे. (Photo Credit : komal_rangoli_art_)
ज्यांना भाऊ नाही किंवा भाऊबीजेला भावाची भेट होणं शक्य नाही अशा बहिणी चंद्रालाच आपला भाऊ मानून त्याचं औक्षण करतात. (Photo Credit : komal_rangoli_art_)