Home /News /lifestyle /

Best Non-veg Restaurant Pune: कोथरुडमधील या 5 हॉटेल्समध्ये मिळेल जबरदस्त चिकन-मटण थाळी

Best Non-veg Restaurant Pune: कोथरुडमधील या 5 हॉटेल्समध्ये मिळेल जबरदस्त चिकन-मटण थाळी

चमचमीत आणि ऑथेंटिक मांसाहारी हॉटेलच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक मेजवानी आहे. पुण्यात कोथरुड येथे (Non-Veg Restaurant Pune Kothrud) अशी काही प्रसिद्ध हॉटेल्स आहेत, जी तुमची मांसाहारी खाण्याची इच्छा नक्कीच पूर्ण करू शकतात.

  नवी दिल्ली, 5 मार्च : अनेकांना बाहेर जाऊन चटकदार, चविष्ट खाण्याची मोठी आवड असते. त्यात शनिवार आणि रविवार आला, की अनेक जण खाण्यासाठी वेगवेगळ्या जागा, हॉटेल्सच्या शोधात असतात. त्यात एखादा नॉन-व्हेज प्रेमी (Non-Veg Hotels) असेल, तर त्यासाठी एकदम ऑथेंटिक मांसाहारी हॉटेल सोने पे सुहागाचं ठरतं. अशात चमचमीत आणि ऑथेंटिक मांसाहारी हॉटेलच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक मेजवानी आहे. पुण्यात कोथरुड येथे (Non-Veg Restaurant Pune Kothrud) अशी काही प्रसिद्ध हॉटेल्स आहेत, जी तुमची मांसाहारी खाण्याची इच्छा नक्कीच पूर्ण करू शकतात. - स्वागत हॉटेल (Swagat Hotel)  पुण्यातील कोथरुड इथे स्वागत हॉटेल नावाचं प्यूअर नॉन-व्हेज हॉटेल आहे. या हॉटेलला 5 star रेटिंग देण्यात आलं आहे. अनेकांनी या हॉटेलला कोथरुडमधील बेस्ट हॉटेल म्हटलं आहे. तसंच येथील सर्विसही चांगली असून रेटही रिजनेबल असल्याने तुम्ही मनसोक्त आनंद घेऊ शकता. या हॉटेलमधील चिकन थाळी तुम्ही ट्राय करू शकता. पत्ता - 88/5&6, शॉप नंबर 7, कनकेश्वल सोसायटी, अतुल टॉवर, 411038 फोन - 020 2538 1166 Google Map - https://goo.gl/maps/L3U4Yy3X16GYkQDK7

  हे वाचा - हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी औषधांची गरज नाही, हे पदार्थ अशक्तपणा घालवतील

  - सह्याद्री हॉटेल (Hotel Sahyadri) - या हॉटेलमधील नॉन-व्हेज थाळी फेमस आहे. या हॉटेलला 4.5 स्टार रेटिंग देण्यता आलं आहे. इथे तुम्ही चिकन सुक्का ही डिश ट्राय करू शकता. पत्ता - गांधी भवन रोड, विवेकानंद कॉलनी, कोथरुड, पुणे 411058 फोन - 098222 87155 Google Map - https://goo.gl/maps/Zn6QM56QmcP68Gow8 - हवेली अनलिमिडेट (Haveli Unlimited) - हवेली अनलिमिडेट 4.5 स्टार रेटिंग हॉटेल आहे. Home Style Masala ही या हॉटेलची खासियत असून इथे सी फूड, नॉर्थ इंडियन, मालवणी, मँग्लोरियन, बिर्याणी असे अनेक प्रकार आहेत. या हॉटेलमधील मटण थाळी, चिंबोरी थाळी फेमस आहे. पत्ता - पुणे रोड, भुसारी कॉलनी, कोथरुड, पुणे 411038 मोबाइल - 077989 94546 Google Map - https://g.page/haveliunlimited?share - व्हेज-नॉन-व्हेज कट्टा (Veg-Non veg Katta) - या हॉटेलला 5 स्टार रेटिंग आहे. या हॉटेलमधील डिशेस चविष्ट असून क्वालिटीसह क्वॉन्टेटीही चांगली आहे. त्याशिवाय हॉटेलमधील लाइट्स, अॅम्बियन्सही चांगला आहे. Wi-fi आणि चांगल्या म्युझिकसाठीही अनेकांनी या हॉटेलला चांगलं रेटिंग दिलं आहे. पत्ता - शॉप नं 13, वनराजी अपार्टमेंट, पौंड रोड, एमआयटी कॉलेजजवळ, कोथरुड, पुणे मोबाइल - 070200 23005 Google Map - https://g.page/veg-non-veg-katta-pune?share

  हे वाचा - पिस्ता खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

  - गंधर्व किचन (Gandharva Kitchen) - गंधर्व किचनला 4.5 स्टार रेटिंग आहे. तसंच डिशेसच्या किंमती रिजनेबल आहेत. नॉन-व्हेजसह इथे चायनिज, नॉर्थ इंडियन डिशेसही सर्व्ह केल्या जातात. पत्ता - FRW6+644, चंद्रालोक नगरी, डहाणूकर कॉलनी, कोथरुड, पुणे 411038 मोबाइल - 078756 09191 Google Map - https://goo.gl/maps/pjtw4N9ZzgrT8aSVA
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Food, Pune, Tasty food

  पुढील बातम्या