जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी औषधांची गरज नाही, हे पदार्थ काही दिवसात अशक्तपणा घालवतील

हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी औषधांची गरज नाही, हे पदार्थ काही दिवसात अशक्तपणा घालवतील

हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी औषधांची गरज नाही, हे पदार्थ काही दिवसात अशक्तपणा घालवतील

आहारात आपण काही भाज्या आणि फळांचा समावेश करून शरीरातील हिमोग्लोबिनची (hemoglobin) पातळी वाढवू शकतो. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 मार्च : जेव्हा हिमोग्लोबिनची कमतरता (Deficiency of hemoglobin) असते तेव्हा शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. अशावेळी अॅनिमियाचा धोका वाढतो. मात्र, यासाठी तुम्हाला कोणतेही औषध घेण्याची गरज नाही. आहारात काही पदार्थांचा समावेश करून हिमोग्लोबिनची (hemoglobin) कमतरता तुम्ही सहजपणे पूर्ण करू शकता. ‘ टीव्ही 9 ’ दिलेल्या बातमीनुसार अनेकदा आजार कमी प्रमाणात असताना औषधांपेक्षा घरगुती औषधी गोष्टींचा वापर करणे उपयोगी ठरते. आहारात आपण काही भाज्या आणि फळांचा समावेश करून शरीरातील हिमोग्लोबिनची (hemoglobin) पातळी वाढवू शकतो. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. आवळा (Amla) - आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण झपाट्याने वाढते. जर तुम्हाला अॅनिमियाची समस्या असेल तर आवळ्याचे नियमित सेवन करावे. आवळा लोणचे, कँडी, चटणी, पावडर, मुरंबा इत्यादी अनेक प्रकारे तुम्ही आवळा खाऊ शकता. मनुके (Raisins) - लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फायबरने समृद्ध असलेले मनुके अशक्तपणा दूर करण्यासाठी देखील खूप उपयुक्त मानले जातात. मनुके भिजवून खाल्ल्यास त्याचे परिणाम अधिक चांगले दिसून येतात. अशक्तपणा आणि थकवा येण्याची समस्या मनुके खाण्यामुळे कमी होते. पालक - पालक हा पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. आयर्न व्यतिरिक्त पालकमध्ये ए, सी, ई, के आणि बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात असतात. याशिवाय मँगनीज, कॅरोटीन, आयोडीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम आणि फॉस्फरस असते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच स्नायूंच्या वाढीसाठीही पालक खूप चांगला मानला जातो. हे वाचा -  मुलांना लहानपणीच शिकवा या गोष्टी; सर्वजण त्यांचेच नव्हे तर तुमचेही करतील कौतुक गुळ - तुम्हाला गोड खायला आवडत असेल तर संपूर्ण हिवाळ्याच्या काळात गुळाचे सेवन अवश्य करावे. गुळामध्ये लोह तसेच व्हिटॅमिन बी 12, बी 6, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यांसारखे पोषक घटक असतात. हे तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतात आणि घसा आणि फुफ्फुसांच्या संसर्गास प्रतिबंध करते. हाडे मजबूत करते आणि शारीरिक थकवा दूर होतो. हे वाचा -  रिकाम्या पोटी रक्तातील साखरेची पातळी का बरं वाढते? मधुमेहींनी अशी घ्यावी काळजी चवळी - शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही चवळीचा आहारात समावेश करू शकता. त्यात 26 ते 29 टक्के लोह असते. तुम्ही ते भाजी किंवा स्प्राउट्सच्या स्वरूपात खाऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात