मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

OMG! कपड्यांप्रमाणे बदलते नवरे, 11 वेळा केलं लग्न; आता शोधतेय बारावा पती

OMG! कपड्यांप्रमाणे बदलते नवरे, 11 वेळा केलं लग्न; आता शोधतेय बारावा पती

कपडे बदलल्याप्रमाणं नवरे बदलणाऱ्या एका महिलेची आश्चर्यकारक (Women did 11 marriages in her life and gets ready for next) गोष्ट समोर आली आहे.

कपडे बदलल्याप्रमाणं नवरे बदलणाऱ्या एका महिलेची आश्चर्यकारक (Women did 11 marriages in her life and gets ready for next) गोष्ट समोर आली आहे.

कपडे बदलल्याप्रमाणं नवरे बदलणाऱ्या एका महिलेची आश्चर्यकारक (Women did 11 marriages in her life and gets ready for next) गोष्ट समोर आली आहे.

  • Published by:  desk news

न्यूयॉर्क, 2 डिसेंबर: कपडे बदलल्याप्रमाणं नवरे बदलणाऱ्या एका महिलेची आश्चर्यकारक (Women did 11 marriages in her life and gets ready for next) गोष्ट समोर आली आहे. या महिलेला लग्न करण्याची इतकी हौस आहे की 52 वर्षांच्या आयुष्यात (11 marriages at the age of 51) तिने तब्बल 11 लग्नं केली आहेत. काही दिवसांपूर्वीच तिचं अखेरचं लग्न मोडलं असून तिनं नव्या पतीचा शोध सुरू केला आहे.

लग्न करण्याची हौस

या महिलेला लग्न करण्याची इतकी हौस आहे की लहानपणापासूनच ती लग्न करण्याची स्वप्नं पाहत होती. लग्न करण्यासाठी वयाची अट पूर्ण होताच तिनं पहिलं लग्न केलं आणि त्यानंतर लग्न करण्याचा तिचा सिलसिला सुरूच राहिला. आपल्या आयुष्यात तिनं 9 जणांसोबत 11 वेळा लग्न केलं आहे. त्यातील दोघांसोबत तिने दोनदा लग्न केलं.

एकही लग्न टिकत नाही

या महिलेचं एकही लग्न टिकत नाही, हे विशेष. महिलेला लग्न करण्याची चांगलीच हौस आहे, मात्र ते टिकवण्यात तिला फारसं स्वारस्य वाटत नाही. काही ना काही कराणावरून तिची पतीशी भांडणं होतात आणि ते वेगळे होण्याचा निर्णय घेतात. जोपर्यंत नैसर्गिकरित्या पतीसोबत आपलं पटतं, तोपर्यंत एकत्र राहावं आणि त्यानंतर राजीखुशीनं वेगळं व्हावं, असं आपल्याला वाटत असल्याचं ही महिला सांगते.

हे वाचा- Cyclone Jawad:आज संध्याकाळपर्यंत 'जवाद' चक्रीवादळ रौद्र रुप धारण करण्याची शक्यता

बाराव्या लग्नासाठी तयार

बाराव्या लग्नासाठी आपण तयार असून त्याविषयी एकासोबत आपलं डेटिंगही सुरू असल्याचं मोनेटनं टीएलसी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या मुलाखतीत तिनं आतापर्यंतच्या पतींबाबतचे अनुभवदेखील शेअर केले आहेत. पाचव्या नंबरचा नवरा सर्वात चांगला होता, सहाव्या नंबरच्या पतीचा स्वभाव चांगला होता, आठव्या पतीला ती पहिल्यांदा ऑनलाईन भेटली होती तर दहाव्या नंबरच्या पतीला ती लहानपणापासन ओळखत होती. सध्या 57 वर्षांच्या जॉन नावाच्या व्यक्तीसोबत ती डेट करत आहे. जॉनसोबत तिने यापूर्वी दोन वेळा लग्न केलं आहे. यंदा पुन्हा लग्न करण्याचा निर्णय़ झाला, तर जॉनसोबतचं तिसरं हे तिसरं लग्न ठरणार आहे.

First published:

Tags: America, Lifestyle, Marriage, Wife and husband