Home /News /lifestyle /

स्किन आणि केसांसाठी तिळाचा असा करा वापर; नॅचरली मिळतील अनेक पोषक घटक

स्किन आणि केसांसाठी तिळाचा असा करा वापर; नॅचरली मिळतील अनेक पोषक घटक

पांढरे तीळ हे व्हिटॅमिन 'के' आणि व्हिटॅमिन 'ई' सोबतच अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्त्रोत मानले जातात. तसेच तिळाच्या तेलामध्ये असलेले लिनोलिक अॅसिड आणि ओलेइक अॅसिड त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

    मुंबई, 15 जून : सुंदर केस आणि चमकदार ग्लोईंग स्कीन असेल तर कोणीही आकर्षक दिसेल. काहीवेळा अगदी अचूक स्किन केअर रूटीन पाळल्यानंतरही केस शायनी आणि त्वचा चमकदार राखणं खूप अवघड काम होऊन बसतं. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत केस आणि त्वचेच्या देखभालीसाठी आपण तिळाचा (Sesame) वापर करू शकतो. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार बनेल, शिवाय केसांच्या अनेक समस्या कमी (Sesame benefits for skin and hair care) होतील. पांढरे तीळ हे व्हिटॅमिन 'के' आणि व्हिटॅमिन 'ई' सोबतच अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्त्रोत मानले जातात. तसेच तिळाच्या तेलामध्ये असलेले लिनोलिक अॅसिड आणि ओलेइक अॅसिड त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. म्हणूनच त्वचा आणि केसांवर तिळाचा वापर आणि त्याचे काही आश्चर्यकारक फायदे आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. चेहरा उजळेल - स्कीन केअरमध्ये तिळाच्या तेलापासून बनवलेला फेस पॅक वापरून आपण त्वचेची सहज निगा राखू शकता. यासाठी मुलतानी मातीमध्ये 1 चिमूट हळद आणि तिळाचे तेल मिक्स करून पेस्ट बनवा. आता ते चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जातील आणि तुमची त्वचा चमकू लागेल. स्क्रबने मऊपणा मिळवा - त्वचा मऊ आणि कोमल बनवण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी चेहऱ्यावर तिळाचे तेल लावा. पाच मिनिटांनंतर तांदळाच्या पावडरने चेहरा स्क्रब करा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून कोरडा करा. कोरडेपणा निघून जाईल - उष्णतेमुळे अनेकदा त्वचा कोरडी आणि निस्तेज वाटू लागते. अशा परिस्थितीत तिळाचा फेस मास्क त्वचेवर खूप प्रभावी ठरू शकतो. यासाठी दुधात भिजवलेले तीळ बारीक करून घ्यावेत. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. काही वेळाने चेहरा साध्या पाण्याने धुवा. हे वाचा - Superfood For Women : वेगवेगळ्या वयोगटानुसार महिलांचा आहार कसा असावा? केस गळती - आठवड्यातून 2-3 वेळा तिळाचे तेल केसांना लावल्यास केस गळती सहज कमी करता येते. यासाठी तिळाच्या तेलात एलोवेरा जेल मिक्स करून केसांना लावा आणि तासाभरानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. केस पांढरे होणार नाहीत - रोज रात्री झोपण्यापूर्वी केसांना तिळाच्या तेलाने मसाज केल्याने पांढऱ्या केसांचा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो. कोमट तिळाचे तेल केसांना लावल्याने पांढरे केस कमी होऊ लागतात. हे वाचा -  जेवणाची भांडी, ताट-वाटीचाही आरोग्यावर होतो परिणाम; या गोष्टींकडे दुर्लक्ष नको कोंडा निघून जाईल - अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल घटक असलेले तिळाचे तेल कोंडा कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर तिळाच्या तेलाचा नियमित वापरून डोक्याच्या त्वचेचा संसर्गही टाळता येतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Skin, Skin care, Woman hair

    पुढील बातम्या