जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / रुबाब म्हणून नव्हे तर पान खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी 10 फायदे!

रुबाब म्हणून नव्हे तर पान खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी 10 फायदे!

रुबाब म्हणून नव्हे तर पान खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी 10 फायदे!

आजही कोणी पान खाणारं कोणी दिसलं की, ही एक वाईट सवय आहे म्हणून त्यांना चार ज्ञानाच्या गोष्टी समजावल्या जातात.

  • -MIN READ
  • Last Updated :

आजही कोणी पान खाणारं कोणी दिसलं की, ही एक वाईट सवय आहे म्हणून त्यांना चार ज्ञानाच्या गोष्टी समजावल्या जातात. पण फार कमी लोकांना माहीत आहे की, पान खाण्याचे फार फायदे आहेत. पण चुना किंवा कात अशा तत्सम गोष्टी त्यात टाकून पान न खाता नुसतं पान खाण्याला प्राधान्य द्यावं. नुसतं पान खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक आजार दूर होतात. पण हेच जर तुम्ही पानात तंबाखू किंवा चुना लावला तर त्याचे फायदे कमी आणि नुकसानच जास्त आहे. नक्की याचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊ- 1 पान खाल्ल्याने सर्दी, थकवा यांसारख्या समस्यांतून आराम मिळतो. याशिवाय यात अनेक आयुर्वेदिक गुणही आहेत. 2 प्राचीन काळापासून सांगण्यात आलं आहे की, पानात अनेक औषधी गुणधर्म आहेत. नियमित पान खाल्ल्याने गंभीर आजारांपासूनही वाचता येतं. 3 हिरड्या आणि दातांच्या दुखण्याने तुम्ही वैतागला असाल तर यावर पान हा एक चांगला पर्याय आहे. पान चाऊन खाल्यास या दुखण्यापासून आराम मिळतो. 4 पान चाऊन खाल्ल्याने दातातील पायरिया रोगही नष्ट होतो आणि दाताचे अन्य विकारही होत नाहीत. 5 पान खाल्ल्याने गुडघ्यांच्या दुखण्यालाही आराम मिळतो आणि यामुळे हाडं मजबूत होतात. 6 पानाला तूप लावून ते तव्यावर गरम करा आणि ज्याठिकाणी इजा झाली आहे तिथे लावा, लगेच आराम मिळेल. 7 तोंड आलं असेल तर पान खाल्ल्याने आराम मिळेल. पानाला तूप लावून ते पान खा. याचा जास्त चांगला फायदा होतो. 8 सर्दी झाल्यास पानात लवंग घालून खा, याशिवाय पानात खडीसाखर टाकून खाल्यासही आराम मिळतो. 9 श्वास घ्यायला त्रास होत असेल तर किंवा छातीत दुखल्यासारखं वाटत असेल तर तव्यावर पान थोडं शेकवा आणि त्यानंतर खा. लगेच आराम मिळेल. 10 जर प्रत्येकवेळी थकवा जाणवत असेल तर पानात वेलची घालून खाल्याने लगेच आराम मिळेल. टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा. या देशात एकही गुन्हेगार नाही, ओस पडलेत जेल फक्त 3 ते 4 हजारांमध्ये फिरू शकता या जागा घरात या दिशेला असाव्यात खिडक्या, नाही तर होऊ शकतं नुकसान! बिबट्याचा जवळून फोटो काढायला गेला अन्… पाहा थरारक VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात