जगात एकीकडे गुन्हेगारी वाढत आहे तर कुठे कमी होत आहे. पण आम्ही जर म्हटलं की एक देश असा आहे जिथे गुन्हेगारी नावालाही मिळणार नाही, तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरंय.. युरोपात असा एक देश आहे जिथे एकही गुन्हा घडत नाही. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)
त्या देशात असा एकही गुन्हेगार राहिला नाही ज्याला तुरुंगात टाकता येईल. अजूनही कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण जगात हा एकमेव देश आहे जिथले तुरुंग ओस पडले आहेत. जाणून घ्या त्या देशाबद्दल (सर्व छायाचित्र- सांकेतिक)
असे अनेक देश आहेत जिथे वर्षांनूवर्ष गुन्हेगार तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. पश्चिम युरोपमधील नेदरलँडमध्ये मात्र गुन्हेगारी सातत्याने कमी होताना दिसत आहे. गुन्हेगारी दर इतका कमी झाला आहे की, तिथले तुरुंग बंद होण्याच्या मार्गावर आहे. कोटी 71 लाख 32 हजार एवढी या देशाची लोकसंख्या आहे. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)
विशेष म्हणजे नेदरलँड देशाकडे तुरुंगात टाकायला एकही गुन्हेगार नाही. 2013 मध्ये फक्त 19 कैदी होते. 2018 पर्यंत या देशात एकही गुन्हेगार राहिला नाही. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)
2016 मध्ये टेलीग्राफ यूकेमध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, नेदरलँडच्या न्याय मंत्रालयाने सांगितले होते की, गेल्या पाच वर्षांमध्ये देशातील गुन्हेगारीत 0.9 टक्क्यापर्यंत घट होईल. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)
नेदरलँडचे तुरुंग बंद झाल्यास दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात येतील. हे जगातील सर्वात सुरक्षित देश होईल. मात्र रोजगारच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर तुरुंगात काम करणारे कर्मचारी बेरोजगार होतील. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)
नेदरलँडमधील तुरुंग बंद झाले तर जवळपास 2 हजार लोकांच्या नोकऱ्या जातील. त्यातल फक्त 700 लोकांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या इतर नोकऱ्यांचा लाभ मिळेल. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)
या देशातील तुरुंग बंद झाली तर नेदरलँड एक देश, एक प्रणाली, एक सरकार आणि नागरिकांसाठी एक यशस्वी देश होईल. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)
या देशातील रिकामी तुरुंग हा मुद्दा एवढा महत्त्वाचा झाला होता की, नेदरलँडला आपल्या सुविधा आणि व्यवस्था चालवण्यासाठी चक्क नॉर्वेवरून गुन्हेगारांना मागवण्यात आलं होतं. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)
नेदरलँडमध्ये गुन्हेगारांसाठी इलेक्ट्रॉनिक अँकल मॉनिटरिंग सिस्टम आहे. यात कैद्यांच्या पायाला एक असं डिवाइस लावलं जातं, ज्यामुळे त्यांचं लोकेशन ट्रेस होऊ शकतं. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)
हे डिवाइस रेडिओ फ्रीक्वेन्सी सिग्नल पाठवतं. ज्यावरून गुन्हेगारांच्या लोकेशनबद्दल पूर्ण माहिती मिळते. जर एखादा कैदी तुरुंगातून पळण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याबद्दल अगदी काही सेकंदांमध्ये कळतं. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)
हे अँकल मॉनिटरिंग सिस्टम देशातील गुन्हेगारी दर कमी करण्यास सक्षम आहे. तिथे कैद्यांना दिवसभर बंद करून ठेवण्याऐवजी काम करायला सांगितलं जातं. तसेच ठरवून दिलेल्या परिसरात मोकळं फिरायला दिलं जातं. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)