जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुम्हाला बारबेरीच्या फायद्यांबद्दल माहिती आहे का? मधुमेह, कोलेस्ट्रॉलसारख्या आजारात असते फायदेशीर

तुम्हाला बारबेरीच्या फायद्यांबद्दल माहिती आहे का? मधुमेह, कोलेस्ट्रॉलसारख्या आजारात असते फायदेशीर

तुम्हाला बारबेरीच्या फायद्यांबद्दल माहिती आहे का? मधुमेह, कोलेस्ट्रॉलसारख्या आजारात असते फायदेशीर

बारबेरीमध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स देखील असतात जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करतात. हे फळ दातांच्या (Good For Dental Health) आरोग्यासाठीदेखील खूप चांगले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 जुलै : बारबेरीच्या झाडावर लहान लाल रंगाच्या बेरी (Red Berries) आढळतात आणि त्यांचा अनेक रोगांवर औषध म्हणून उपयोग होतो. त्यात असे अनेक घटक असतात जे मधुमेह (Diabetes), कोलेस्ट्रॉल (Cholesterol), संसर्ग (Infections) इत्यादींवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. चांगली गोष्ट अशी आहे की त्यामध्ये पौष्टिक घटकही खूप जास्त असतात आणि त्यामुळे यातून मिळणाऱ्या फायद्यांची संख्याही खूप जास्त असते. यामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स देखील असतात जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करतात. हे फळ दातांच्या (Good For Dental Health) आरोग्यासाठीदेखील खूप चांगले आहे. डायरिया, मेटाबॉलिक सिंड्रोमसारख्या (Metabolic Syndrome) समस्यादेखील याद्वारे बऱ्या होऊ शकतात. चला जाणून घेऊया बारबेरीचे काही फायदे. बारबेरीचे फायदे (Benefits Of Barberries) - हेल्थ लाइननुसार, हाय ब्लड शुगर असलेल्या रुग्णांसाठीदेखील बारबेरी फायदेशीर आहे. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी हे उपयुक्त मानले जाते. बारबेरी इन्सुलिन हार्मोनला पेशींच्या प्रतिसादाचे नियमन करण्यास मदत करते. - बारबेरी अतिसार बरे करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. याचे सेवन केल्याने संसर्ग आणि जुलाब (Diarrhea) निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोरोना काळात भारतीयांनी खाल्ले 3 लाख टन काजू, मागणीमुळे आता दर वाढणार - बारबेरी कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात आणि मेटाबॉलिक सिंड्रोमपासून संरक्षण करतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयविकाराचा धोकादेखील कमी होतो. - यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आणि दातांची जळजळ दूर करण्यासाठीदेखील उपयुक्त आहेत. - यात अनेक कर्करोगविरोधी प्रभाव आहेत, ज्यामुळे कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. - बारबेरी ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून पेशींचे संरक्षण करण्यासदेखील मदत करते.

Business Idea : 8000 रूपये क्विंटल दर असलेल्या ‘या’ गव्हाची शेती करा आणि व्हा मालामाल!

- बारबेरी त्वचेसाठीदेखील खूप फायदेशीर आहेत. कारण त्यात असलेले दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेवर मुरुम येण्याची शक्यता दूर करतात. - बारबेरी हे फळ चिंचेप्रमाणे मानले जाते. ते चवीला किंचित आंबट आणि तिखट असते. हे आपण कच्चेदेखील खाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात