मुंबई, 09 फेब्रुवारी: 'दूध' (Milk) हे पूर्ण अन्न समजलं जातं. गाईचं दूध हे कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहे. याशिवाय दुधामध्ये प्रथिनं (Protein), फॉस्फरस (Phosphorus), पोटॅशियम (Potassium), जस्त (Zinc) आणि आयोडीन (Iodine) ही खनिजं तसंच व्हिटॅमिन डी (vitamin D), व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी2 (riboflavin), बी12 (cobalamin) ही जीवनसत्वदेखील असतात. दुधात असलेल्या पोषक घटकांमुळे दिवसभरात एकदा तरी दूध पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. अनेक लोक विविध पद्धतीनं दुधाचं सेवन करतात. काहीजण सकाळी दूध पितात तर काहीजण रात्री झोपण्यापूर्वी दूध घेतात.
विविध देशात रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध (Warm milk) पिण्याची आवड असते. पण असं का केलं जातं, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? वेगवेगळ्या ठिकाणी यासाठी वेगवेगळी कारणं दिली जातात. काहींच्या मते, कोमट दुधाने चांगली झोप (Sleep) येते, तर काही म्हणतात की यामुळे पोट साफ राहतं. सध्या जगभरात निद्रानाशाची (Insomnia) समस्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोमट दूध आणि झोपेचा संबंध आहे की नाही हे समजून घेणं गरजेचं आहे.
हे वाचा-बापरे! आईच्या एका केसामुळे लेकाचे झाले हाल; 5 महिन्यांच्या बाळाची भयंकर अवस्था
कोमट दूध शरीरावर कसा परिणाम करतं, हे समजून घेण्यासाठी नेदरलँडमधील (Netherlands) 15 महिलांवर संशोधन करण्यात आलं. या सर्व महिला निद्रानाशाच्या समस्येनं त्रस्त होत्या. दूध प्यायल्यानंतर त्यांची झोप सुधारल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. दुधात मॅग्नेशियम आणि प्रोटीन कॅसिन हायड्रोलिसेटचं (casein hydrolysate) प्रमाण पुरेसं असल्यास व्यक्तीची झोप सुधारते, असं अहवालात म्हटलं आहे. हेल्थलाईननं दिलेल्या रिपोर्टनुसार, कोमट दुधामुळे वजन वाढण्याच्या समस्येपासूनही सुटका होते. 1800 महिलांवर केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. दूध पिणाऱ्या महिलांमध्ये लठ्ठपणाचा धोका कमी झाल्याचा निष्कर्ष संशोधनातून निघाला आहे.
हे वाचा-स्ट्रेच मार्क्स दूर करायला, हे तेल आहे रामबाण उपाय! कसं वापरायचं आणि कधी?
बीबीसीच्या सायन्स फोकस (BBC Science Focus) या मासिकाच्या रिपोर्टनुसार, कोमट दुधात अनेक गुणधर्म आहेत. उदाहरणार्थ, दुधामध्ये अल्फा-लॅक्टलब्युमिन (alpha lactalbumin) नावाचं एक विशेष प्रकारचं प्रोटीन असतं. हे अमीनो अॅसिड ट्रायप्टोफॅनचा चांगला स्रोत आहे. हे अॅसिड शरीरात पोहोचल्यानंतर सेरोटोनिन नावाचं न्यूरोट्रान्समीटर (Neurotransmitter) तयार करतं. हे न्यूरोट्रान्समीटर एखाद्या व्यक्तीचा मूड आणि झोप नियंत्रित करतं. अल्फा-लॅक्टलब्युमिन आपल्या शरीरात पोहोचल्यानंतर, रक्तामध्ये अमिनो अॅसिड ट्रायप्टोफॅनचं प्रमाण वाढू लागतं. त्याचा परिणाम झोपेवर होऊन आपल्याला पूर्वीपेक्षा चांगली झोप लागते. याशिवाय दुधामध्ये तणाव (Stress) कमी करणारे घटकदेखील असतात.
एकूणच, रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध प्यायल्यास आपल्या शरीराला फायदा होतो. त्यामुळे जर तुम्ही निद्रानाशाच्या समस्येनं त्रस्त असाल तर झोपण्यापूर्वी कोमट दूध पिण्यास हरकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.