लंडन, 09 फेब्रुवारी : आपल्या बाळाला काहीही होऊ नये, यासाठी त्याची आई त्याची खूप काळजी घेते. बाळाच्या शरीरावर छोटीशी जरी संशयास्पद खूप दिसली तरी तिच्या काळजात धस्सं होतं. अशात जर आपल्यामुळेच आपल्या बाळाचा जीव धोक्यात आला आहे, असं समजलं तर त्या आईचं काय झालं असेल. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. आईच्या एका केसामुळे 5 महिन्यांच्या बाळाची भयंकर अवस्था झाली (Mother hair in baby leg). यूकेतील सारा नावाची महिला. तिचं पाच वर्षांचं बाळ लोगन ज्याचा पाय अचानक सूजू लागला. आपल्या बाळासोबत असं अचानक का होतं आहे ते तिला समजत नव्हतं. तिने त्याचा पाय नीट तपासला तेव्हा तिला त्याच्या पायाच्या बोटांमध्ये रॅशसारखं काहीतरी दिसलं पण त्यात तिला काही खास दिसलं नाही. पण काही दिवसांतच लोगनचा पाय सुजू लागला. पण नंतर बाळाची अवस्था पाहून तिला चिंता वाटू लागली. तिने त्याला घेऊन डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी तिथं जे दाखवलं ते पाहून सर्वजण हैराण झाले.
लोगनच्या पायातील एका बोटात एक केस अडकला होता. हा केस त्या बोटांभोवती गुंडाळेला होता. ज्यामुळे त्याच्या बोटातून रक्तप्रवाह होत नव्हता. यामुळेच त्याचं बोट लाल झालं होतं आणि सूजलं होतं. डॉक्टरांनी त्याला हेअर टुनिकेट सिंड्रोम असं म्हटलं. साराच्या मते, तिचा हा केस लोगच्या पजाम्यामध्ये अडकलेला असावा. लोगनला पजामा घातल्यानंतर तो त्याच्या पायाच्या बोटात अडकला असावा. हे वाचा - तुम्ही बाळासाठी ही Baby powder वापरत असाल तर सावधान; कॅन्सरचा धोका डॉक्टरांनी चिमट्याने बोटातील केस काढण्याचा प्रयत्न केला, पण यामुळे केसाचा फक्त एक तुकडाच निघाला, तब्बल 40 मिनिटं डॉक्टरांनी प्रयत्न केलं पण त्याच्या बोटातील पूर्ण केस बाहेर येऊ शकला नाही. सारा लोगनला घरी घेऊन आली तेव्हा त्याचा पाय निळा पडू लागला. डॉक्टरांनी चिमट्याने केस काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो केस बाळाच्या बोटात आणखी घट्ट झाला आणि त्यामुळे त्याचा रक्तप्रवाह पूर्णपणे ब्लॉक झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लोगनचं बोट कापण्याशिवाय डॉक्टरांना दुसरा कोणताच पर्याय दिसत नव्हता.
डॉक्टरांनी रात्रभर प्रयत्न केले आणि अखेर त्याच्या पायाच्या बोटातील केस काढण्यात यश मिळालं. हे वाचा - तुमचं बाळही झोपेतून दचकून, घाबरून जागं होतंय का? याची कारणं आणि उपाय समजून घ्या आपल्या एका केसामुळे आपल्या बाळाला इतका त्रास होतो आहे, यामुळे सारा हैराण झाली होती. त्यामुळे आता इतर पालकांना जागरूक करण्यासाठी तिने सोशल मीडियावर हे प्रकरण शेअर केलं आहे. आईने आपल्या बाळाच्या शरीरापासून आपले केस दूरच ठेवावे नाहीतर ते बाळासाठी जीवघेणे ठरतील, असा सल्लाही तिने मातांना दिला आहे.