जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / या सोप्या Breathing Exercises बेली फॅट करतील कमी; बसल्या-बसल्या करू शकता

या सोप्या Breathing Exercises बेली फॅट करतील कमी; बसल्या-बसल्या करू शकता

ब्रीदिंग एक्सरसाईज करण्याचे फायदे

ब्रीदिंग एक्सरसाईज करण्याचे फायदे

त्याबरोबर बेलीफॅट कमी करण्यासाठी काही ब्रिदींग एक्ससाईजचा फायदा होऊ शकतो. या सोप्या एक्ससाईज करायलाही वेळ कमी लागतो. त्याविषयी अधिक जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 09 डिसेंबर : शरीरावर वाढणाऱ्या चरबीपेक्षा पोटावर चरबी लवकर वाढते. चरबी जेवढ्या लवकर वाढते तेवढ्या लवकर कमी करता येत नाही. पोटाचा घेर कमी करण्यासाठी महिला किंवा पुरुष सगळेच खूप प्रयत्न करतात. मात्र, काही केल्या सहजासहजी ते कमी होत नाही. रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला त्याकडे लक्ष द्यायला वेळही नसतो. मात्र, केवळ आहारात बदल केला किंवा फास्टींग (उपवास किंवा प्रमाणात खाणं) केलं तर, लगेच पोटाचा घेर कमी होतो असं नाही. पोटाचा घेर वाढतो तो पोटावरची चरबी वाढल्यामुळे. आहारावर नियंत्रण आणि त्याला व्यायामाची जोड दिली तर, या समस्येतून लवकर सुटका होऊ शकते. त्याबरोबर बेलीफॅट कमी करण्यासाठी काही ब्रिदींग एक्ससाईजचा फायदा होऊ शकतो. या सोप्या एक्ससाईज करायलाही वेळ कमी लागतो. योगामध्येही श्वसनाचे काही व्यायाम सांगितलेले आहेत. प्राणायाम, भ्रामरी, कपालभाती सारखे योगा प्रकार आरोग्याला फायदा देतात. त्याबरोबर पोटाचा घेर कमी करण्यासाठीही उपयोगी ठरतात. आणखी कोणत्या ब्रिदींग एक्ससाईज करता येतील ते जाणून घेऊयात. बेली ब्रिदींग बेली ब्रिदींग **(Belly breathing)**ने बेली फॅट कमी होतेच शिवाय मनावरचा तणावही कमी होतो. बेली ब्रिदींग कसं करायचं पाहुयात. खुर्चीत पाठ ताठ ठेऊन बसा किंवा ताठ उभे रहा. सर्वात आधी डोक्यातले सगळे विचार दूर सारा. मन शांत करण्याचा प्रयत्न करा. हात पोटावर ठेवा. हळूहळू श्वास घ्या. श्वास घेताना छाती फुगवू नका. पोट फुगवण्याचा प्रयत्न करा. माऊथ ब्रिदींग पोटाची चरबी कमी करायची असेल तर माऊथ ब्रिदींग (Mouth breathing) एक्ससाईजने फायदा होईल. तोंडाने श्वासोच्छवास करण्याच्या क्रियेने पोटावरील चरबी कमी होते. पण हा शासोच्छवास नेहमी प्रमाणे नाही तर, वेगळ्या पद्धतीने करावा. आपलं तोंड उघडा आणि 10 अंक मोजत श्वास आत घ्या. त्यानंतर हळूहळू श्वास सोडा. श्वास घेण्याच्या प्रक्रियेपेक्षा ही क्रिया हळू व्हायला हवी. दिवसातल्या कोणत्याही वेळी ही क्रिया करू शकता. पण एका वेळी 5 ते 10 वेळाच ही क्रिया करावी.

News18लोकमत
News18लोकमत

डीप ब्रीदींग -  या एक्ससाईजसाठी जमिनीवर ब्रह्मासनात बसा. हात एकमेकांवर ठेवत पोटाजवळ न्या. डोळे बंद करा. आता खोल श्वास घ्या आपलं संपूर्ण लक्ष श्वासावर असू द्या. ही क्रिया 10 मिनिटं करा. डीप ब्रिदींग **(Deep breathing)**ने श्वसन क्रिया चांगली होतेच. त्याबरोबर पोटावरची चरबीही कमी होते. हे वाचा -  हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच व्हा सावध! Fit हार्टसाठी आहारात घ्या हे 5 पदार्थ डायफ्राम ब्रीदींग -  डायफ्राम श्वास क्रिया (Diaphragm breathing) आपले एब्डोमिनल मसल्स मजबूत करते. पचनसंस्था मजबूत होते आणि बेली फॅट कमी करते. या एक्ससाईजसाठी आधी पाठीवर झोपा. पूर्ण श्वास घ्या. श्वास सोडताना पोट आत जायला हवं. हे वाचा -  पॉर्न स्टार मार्टिनी का होतेय गुगलवर इतकी सर्च; 2022 च्या आहे टॉप 10 लिस्टमध्ये (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात