मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पॉर्न स्टार मार्टिनी का होतेय गुगलवर इतकी सर्च; 2022 च्या आहे टॉप 10 लिस्टमध्ये

पॉर्न स्टार मार्टिनी का होतेय गुगलवर इतकी सर्च; 2022 च्या आहे टॉप 10 लिस्टमध्ये

गुगल ट्रेंड

गुगल ट्रेंड

सध्या डिसेंबर 2022 चालू असून या वर्षभरात गुगल ट्रेंड झालेल्या गोष्टींची माहिती गुगल ट्रेंडमधून मिळत आहे. ट्रेंडीग लिस्टनुसार गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलं ते म्हणजे पॉर्न स्टार मार्टिनी (Porn Star Martini).

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 08 डिसेंबर : गुगलवर कधी काय ट्रेंड होईल सांगता येत नाही. गुगल सर्च इंजिनला आपण आपल्या मनातील कोणतेही प्रश्न विचारतो आणि गुगल त्याची हजारो उत्तरं तुमच्यासमोर आणून ठेवतं. गल्लीपासून ते जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणतीही माहिती गुगल आपल्या समोर आणत असतं. काही बाबतीत जगाच्या कानाकोपऱ्यातून समान गोष्टीचा शोध गुगलवर घेतला जातो. वर्षाच्या शेवटी गुगलकडून सर्वात जास्त सर्च केलेल्या गोष्टींची माहिती रँकनुसार जाहीर केली जाते.

सध्या डिसेंबर 2022 चालू असून या वर्षभरात गुगल ट्रेंड झालेल्या गोष्टींची माहिती गुगल ट्रेंडमधून मिळत आहे. ट्रेंडीग लिस्टनुसार गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलं ते म्हणजे पॉर्न स्टार मार्टिनी (Porn Star Martini).

कोण आहे पॉर्न स्टार मार्टिनी?

आता यावरून कोणाच्याही मनात आलं असेल की ही पॉर्न स्टार मार्टिनी कोण आहे? ती एखाद्या अॅडल्ट फिल्ममध्ये काम करणारी अभिनेत्री असावी असा अंदाज अनेकांनी बांधला असेल, पण तुम्ही जो विचार करताय, तसं अजिबातच नाही. खरंतर पॉर्न स्टार मार्टिनी हे एका पेय पदार्थाचे नाव आहे. लॉकडाऊन काळात जगभरात पॉर्न स्टार मार्टिनीची रेसिपी मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरात लॉकडाऊन लावण्यात आला. या काळात लोकं घरातच अडकून पडली होती. अशात लोकांनी घरात बसून विविध प्रकारच्या खाण्याचे पदार्थ बनवण्यावर जोर दिला होता. अनेक पदार्थांच्या रेसिपी गुगलवर शोधण्यात आल्या आणि यात पॉर्न स्टार मार्टिनीच रेसिपी जास्त सर्च करण्यात आल्याचे ट्रेंडवरून दिसत आहे.

नावावर लोकांचा आक्षेप

पॉर्न स्टार मार्टिनी एक क्लासिक फ्रूट कॉकटेल असल्याचे सांगितले जाते. सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या यादीत हे कॉकटेल पेय सहाव्या स्थानावर आहे. हे फ्रूट कॉकटेल त्याच्या नावामुळे जास्त चर्चेत आहे. पॉर्न स्टार मार्टिनी या नावावर अनेकांनी आक्षेपही घेतल्याचेही सांगितले जात आहे.

आणखी कोणते पदार्थ ट्रेंडमध्ये?

वर्ष 2022 म्हणजे पनीर पसंदा ही रेसिप सर्वात जास्त सर्च केली गेली. 2022 च्या टॉप सर्च फूड आयटममध्ये मोदकही दुसऱ्या स्थानावर आहे. मोदक बनवण्याची रेसिपीही लोकांनी खूप पाहिली. तसंच मलाई कोफ्ते, चिकन सूप आणि sex on the beach या रेसिपीही गुगलवर मोठ्या प्रमाणावर सर्च केल्या गेल्याचे दिसत आहेत.

हे वाचा - Google वर सगळ्यात जास्त कुठली रेसिपी सर्च झाली माहितीये? मराठमोळ्या पदार्थाने केलं पनीर, पिझ्झाला धोबीपछाड

भारतातील 2022 मधील ट्रेंडिग रेसिपी -

1) पनीर पसंदा (Paneer Pasanda)

2) Modak

3) Sex on the beach

4) Chicken soup

5) मलाई कोफ्ते (Malai Kofta)

6) Pornstar martini

7) Pizza Margherita

8) Pancake

9) पनीर भुर्जी (Paneer Burji)

10)Anarse

First published:

Tags: Food, Tasty food