मुंबई, 19 नोव्हेंबर : हल्ली लोक आपल्या वाढत्या वजन आणि वाढत्या पोटाच्या घराकडे खूप लक्ष देतात. पोटाचा वाढत घेर कुणालाच आवडत नाही. म्हणून तो कमी करण्यासाठी लोक सगळे शक्य ते सर्व प्रयत्न करतात. मात्र काही लोकांना जास्त व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला एका योगासनाबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही जेवण केल्यानंतर अगदी सहज करू शकता.
हे आसन करणं इतकं सोपं आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते आरामात करू शकतात. अन्न खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटत असेल किंवा चालण्यात अडचण येत असेल तर योगासने तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करा. यामुळे तुम्ही फिट राहाल आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतील. चला तर मग जाणून घेऊया हे आसन कोणतं आहे? ते कसं करायचं? आणि त्याचे फायदे.
Health Tips: फक्त रोगप्रतिरशक्ती वाढवण्यासाठीच नाही तर स्लिम अन् फिट ठेवण्यासाठीही गुळवेल उपयुक्त
फक्त 15 मिनिटे वेळ द्यावा लागेल
दुपारच्या जेवणानंतर 15 मिनिटे तुम्ही वज्रासन करू शकता. यामुळे पचनसंस्था मजबूत होते, रक्ताभिसरण सुधारते. अनेक तास एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्यांसाठी वज्रासन खूप फायदेशीर आहे. यामुळे पायांच्या स्नायूंवर अतिरिक्त दबाव पडेल आणि रक्ताभिसरण चांगले होईल. हे नियमितपणे केल्यास शरीराला आकार येतो, तुमची झोपेची पद्धतही सुधारते. सर्व वयोगटातील लोक हे आसन सहज करू शकतात. लहान मुलांनाही वज्रासन करण्याची सवय लागल्यास चांगले, ज्यामुळे त्यांची पचनक्रिया चांगली होते.
वज्रासनाचे फायदे
- वज्रासन नाडी उत्तेजित करते, ज्यामुळे अन्न पचणे सोपे होते.
- हे सायटिका, मज्जातंतूशी संबंधित समस्या आणि अपचनापासून मुक्त होण्यास मदत करते.
- हे पेल्विक क्षेत्र आणि ओटीपोटात रक्त प्रवाह सुधारते, ज्यामुळे आतड्यांसंबंधी हालचाल होण्यास मदत होते.
- त्यामुळे शरीरातील पोषक तत्वे शोषून घेण्यास मदत होते.
- लिव्हरच्या कार्यातही मदत होते.
- पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हे गुणकारी आहे.
वज्रासन करण्याची योग्य पद्धत
- सर्व प्रथम गुडघ्यावर बसा.
- पाठीचा कणा सरळ ठेवा.
- पाय जमिनीवर सरळ ठेवा आणि बोटे जमिनीकडे आणि टाच छताकडे असाव्यात.
- तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि ही मुद्रा स्थिर ठेवा.
- या आसनात काही मिनिटे बसा.
जेवणानंतर गोड खाल्ल्याने वाढतं वजन; तज्ज्ञांनी दिला कंट्रोल करण्याचा रामबाण उपाय
हे एकमेव आसन आहे जे पोट भरल्यानंतरही करता येते. हे मांड्या, पाय, पृष्ठभाग, गुडघे, कंबर, घोट्याच्या समस्यांमध्ये आराम देते. पायात किंवा गुडघ्यात दुखापत किंवा दुखत असल्यास हे आसन करणे टाळावे. हे आसन करणे खूप सोपे आहे, ते दुपारी जेवणानंतर किंवा तुमच्या सोयीनुसार काही मिनिटे करता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Weight, Weight loss tips