मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Health Tips: फक्त रोगप्रतिरशक्ती वाढवण्यासाठीच नाही तर स्लिम अन् फिट ठेवण्यासाठीही गुळवेल उपयुक्त

Health Tips: फक्त रोगप्रतिरशक्ती वाढवण्यासाठीच नाही तर स्लिम अन् फिट ठेवण्यासाठीही गुळवेल उपयुक्त

डबल धमाका! फक्त रोगप्रतिरशक्ती वाढवण्यासाठीच नाही तर स्लिम अन् फिट ठेवण्यासाठीही गुळवेल उपयुक्त

डबल धमाका! फक्त रोगप्रतिरशक्ती वाढवण्यासाठीच नाही तर स्लिम अन् फिट ठेवण्यासाठीही गुळवेल उपयुक्त

सातत्यानं वजन वाढण्याची समस्या भेडसावत असेल आणि वजनावर वेगानं नियंत्रण मिळवता यावं असं वाटत असेल तर गुळवेलीचा आहारात समावेश करायला हवा.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 29 ऑक्टोबर: बदलती जीवनशैली, असंतुलित आहार आणि व्यायामाच्या अभावामुळे सध्या अनेक आजार जडत आहेत. फास्ट फूडच्या सेवनाचं प्रमाण अधिक झाल्यानं वजन वाढून अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. वजन घटवण्यासाठी अमाप पैसे खर्च करून वेगवेगळी औषधं घेतली जातात. योगा, झुंबा डान्स असे उपायही केले जातात. परंतु आहारावर नियंत्रण नसल्यानं वजन काही केल्या कमी होत नाही, असा अनेकांचा अनुभव असतो. वजन घटवण्यासाठी काही घरगुती उपाय करूनही फायदा मिळू शकतो. आयुर्वेदीयदृष्ट्या महत्त्व असलेली गुळवेल अनेक अर्थांनी गुणकारी आहे. याचं सेवन केल्यानं वजन कमी होतं. शिवाय शरीराला याचे इतरही फायदे मिळतात. या संदर्भात माहिती देणारं वृत्त ‘झी न्यूज हिंदी’ने दिलं आहे.

    कोरोनाचं संकट उद्भवल्यानंतर जगाला मोठा फटका बसला; पण निरोगी आयुष्य जगण्याच्या दृष्टीने माणसं खूप सजग झाली. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक आयुर्वेदिक उपाय करणंही अनेकांनी सुरू केलं. वनौषधींवरचा विश्वासही खूप वाढला. आयुर्वेदानुसार औषधी गुण असलेल्या गुळवेलीच्या सेवनानं आरोग्याला अनेक फायदे होतात. याबद्दल जाणून घेऊ या.

    शरीरातली चरबी होते नष्ट-

    सातत्यानं वजन वाढण्याची समस्या भेडसावत असेल आणि वजनावर वेगानं नियंत्रण मिळवता यावं असं वाटत असेल तर गुळवेलीचा आहारात समावेश करायला हवा. गुळवेलीमध्ये अ‍ॅडिपोनेक्टिन आणि लेप्टिन नावाचे घटक आढळतात. शरीरातली अनावश्यक चरबी नष्ट करण्यासाठी या घटकांचा उपयोग होतो. कमी काळात वजन कमी करण्यासाठी या घटकांचा फायदा होतो.

    मानसिक तणाव होईल दूर-

    तुम्ही सतत मानसिक तणावात राहत असाल किंवा नैराश्यानं तुम्हाला घेरलं असेल तर गुळवेलीच्या सेवनाचा फायदा होऊ शकतो. गुळवेलीचं नियमित सेवन केल्यास शांत, चांगली झोप लागते व तणाव नाहीसा करण्यासाठीही याचा चांगला फायदा होतो. चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी ही बाब महत्त्वाची ठरते.

    हेही वाचा: लहान मुलांना पॅरॅसिटॅमॉल देताना या गोष्टी लक्षात घ्या; नाहीतर होऊ शकतात दुष्परिणाम

    धोकादायक अँटिऑक्सिडंट्स शरीराबाहेर काढण्यास मदत-

    रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुळवेल महत्त्वाची कामगिरी बजावते. शरीरात फ्री रॅडिकल्स हे घातक घटक असतात. त्यांच्याशी लढण्यासाठी गुळवेलचा उपयोग होतो. शरीरातले विषारी अँटिऑक्सिडंट्स बाहेर काढण्याचं कामही याद्वारे केलं जातं. याच्या सेवनानं शरीरातल्या पेशी मजबूत होतात. यामुळे आजारांशी लढण्याची ताकद मिळत असते.

    डायबेटीस नियंत्रणासाठी महत्त्वाचं-

    डायबेटीस असलेल्या रुग्णासांठी गुळवेलीचं सेवन उपयुक्त ठरतं. हा आजार असणाऱ्यांनी उपाशीपोटी दररोज एक ग्लास गुळवेल ज्यूस प्यायला हवं. ज्यूस कडू असलं तरी यामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. अर्थात, हे ज्यूस घेण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

    अपचनाच्या समस्येपासून होते सुटका-

    अपचनाच्या समस्येवर गुळवेल प्रभावी काम करू शकते. अपचन, अ‍ॅसिडिटी किंवा पोटदुखी असेल तर गुळवेल व आवळ्याचा ज्यूस मिक्स करून प्यावा. यामुळे त्वरित आराम मिळतो.

    First published:

    Tags: Health, Health Tips, Weight loss