मुंबई, 26 ऑक्टोबर : मिठाईशिवाय बऱ्याच लोकांचे जेवण पूर्ण होत नाही. जेवणानंतर गोड खाणे जवळजवळ सर्वांनाच आवडते. यातही सरावात जास्त तीव्रतेने रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. साखर म्हणजेच गोड खाल्ल्याने डोपामाइन हार्मोनची पातळी वाढते. ज्यामुळे आपल्याला मनाला आनंद आणि समाधान मिळते. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी खरंच चांगली आहे का? रात्री उशिरा जेव्हा तुम्ही जड जेवणानंतर मिठाई खाता, तेव्हा त्या अन्नाचे पचन व्हायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे जेवणानंतर मिठाई खाणे टाळावे. याउलट आपण जेवणापूर्वी गोड पदार्थ खाल्ल्याने पचन स्रावांचा प्रवाह वाढतो. ज्यामुळे आपल्या पचन प्रक्रियेची गती सुधारण्यास मदत होते. याबद्दल आयुर्वेदिक डॉक्टर नागरेकर यांनी माहिती दिली आहे. त्यांनी जेवणानंतर गोड पदार्थ का खाऊ नये आणि ही सवय सोडवण्यासाठी एक उत्तम उपाय सांगितलं आहे.
Diwali 2022: दिवाळीत लाडू, चकल्या, करंज्या खाऊन तुमच्याही पोटाचा बँड वाजलाय का? मग ‘हे’ उपाय नक्की कराजेवणानंतर गोड खाणे टाळण्यासाठी उपाय ज्यांना जेवणानंतर गोड खाण्याची कायम तीव्र इच्छा होते. त्यांची ही सवय हळूहळू व्यसन बनत जाते. मग त्यांना अनेक प्रकारचे त्रास होतात. मात्र एक उपाय केल्यास तुमची ही सवय बंद होऊ शकते. यासाठी २ काळे खजूर आणि ५ काळ्या मनुका घ्या. ते एका वाटी पाण्यामध्ये दोन तास भिजत ठेवा. दोन तासानंतर ते त्याच्य पाण्यात चांगले एकजीव करून घ्या.
नंतर त्यातील कोळ दाबून बाजूला काढा. याचे एक द्रावण तयार होईल. हे मिश्रण जेवणापूर्वी प्यावे. यामुळे तुमची जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा कमी होते. हा उपाय सलग सात दिवस केल्यास तुमची जेवणानंतर गोड खाण्याची सवय कायमची मोडेल आणि याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणामदेखील होणार नाही. केवळ तुम्हाला डायबिटीज किंवा कोणत्याही पदार्थाची ऍलर्जी असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. जेवणानंतर गोड खाल्ल्याने काय होते? - रात्रीच्या जेवणानंतर गोड खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. कारण यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडते. यामुळे वजन वाढण्याचीदेखील शक्यता असते. कोरोनरी हृदयरोगाच्या मागे गोड पदार्थ मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतात. - आयुर्वेदानुसार जेवण करण्यापूर्वी गोड खाणे चांगले. पण जेवणानंतर मिठाई खाण्याची सवय टाळण्याची अनेक कारणे आहेत. रात्री जड जेवणानंतर मिठाई खाल्ल्यास ती पचायला बराच वेळ लागतो आणि परिणामी रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. Diwali 2022 : मिठाई कितीही खाल्ली तरी काही फरक पडणार नाही; फक्त खाण्याची पद्धत बदला - जेवणानंतर मिठाई खाल्ल्यास पचनक्रिया बिघडते, गॅस आणि पोटफुगीचा त्रास होतो.