मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुम्ही प्लास्टिकचा भात तर खात नाही ना? 'या' ट्रीकने ओळखा तांदूळ बनावट की खरा

तुम्ही प्लास्टिकचा भात तर खात नाही ना? 'या' ट्रीकने ओळखा तांदूळ बनावट की खरा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 05 ऑक्टोबर : आजकाल सगळ्याच गोष्टींमध्ये भेसळ झाल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. मग ते खाण्याचे पदार्थ असोत, रस्ते असोत, सिमेंट असोत किंवा आणखी काही. त्यात खाण्याच्या पदार्थांच्या भेसळीचा परिणाम आपल्या शरीरावर डायरेक्ट होतो. ज्यामुळे लोकं आजारी पडतात किंवा यामुळे अनेकांचा जीव देखील गेला आहे. आपण या संबंधीत अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पाहिले असेल.

भाज्यांपासून ते कडधान्य, तांदूळ, गहू यांची देखील भेसळ होते. ज्यामुळे लोकांना दररोज ते खात असलेली वस्तू भेसळयुक्त तर नाही ना असा प्रश्न पडतो. मधल्या काळात तर तांदूळ हे प्लास्टिकचं बनून येतं असं आपण ऐकलं होतं. ज्यामुळे अनेकांच्या मनात याबद्दल शंका देखील उत्पन्न झाली आहे.

खरंतर प्लास्टिकचा तांदूळ शिजवल्यानंतरही तो खोटा आहे की खरा हे समजू शकत नाही. ज्यामुळे तो ओळखता येणं कठीण आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही टीप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करुन तुम्ही तांदूळ प्लास्टिकचा आहे की नाही हे कळेल.

हे वाचा : कच्चे गाजर खाण्याचे शरीरासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

बासमती तांदळाबद्दल जाणून घ्या

बासमती तांदूळ सुगंधी तांदूळ आहे, जो भारत, पाकिस्तान आणि नेपाळमध्ये केला जातो. हा तांदूळ पारदर्शक, बारीक आणि सुगंधीत आहे. तसेच तो शिजवल्यानंतर तांदळाची लांबी दुप्पट होते. हा भात शिजल्यावरही चिकटत नाही, पण थोडा फुगतो. या खास वैशिष्ट्यामुळे ते देशभरात लोकप्रिय आहे.

चुना मिसळून ओळखा

तांदळाचे काही नमुने एका भांड्यात ठेवा. त्यात चुना आणि पाणी मिसळून त्याचं मिश्रण तयार करा. आता या द्रावणात तांदूळ भिजवून काही वेळ राहू द्या. काही वेळाने भाताचा रंग बदलला किंवा रंग सुटला तर समजून घ्या की हा तांदूळ बनावट आहे.

हे वाचा : Corn Bread For Diabetics: डायबेटिस असणाऱ्यांना मक्याची भाकरी फायदेशीर ठरू शकते का?

आता बनावट तांदूळ कसं ओळखायचं चला पाहू

1. थोडा तांदूळ गॅसवर किंवा आगीवर ठेवा, जळताना प्लास्टिक जळल्यासारखा वास येत असेल तर समजा की तो प्लास्टिकचा तांदूळ आहे.

२. तांदूळ प्लास्टीकचा असेल तर तो गरम तेलात टाकल्यावर वितळू लागेल.

3. प्लास्टीकचा तांदूळ पाण्यात टाकल्यावर तो तरंगायला लागतो.

4. प्लॅस्टिकचा तांदूळ उकळताना भांड्याच्या वरचा भाग जाड थरासारखा दिसतो.

5. याशिवाय एक उपाय म्हणजे तांदूळ शिजवल्यानंतर काही दिवस असेच राहू द्या, हा जर प्लास्टिकचा तांदूळ असेल तर त्याचा वास येणार नाही कारण तो कुजत नाही.

प्लास्टिकचा तांदूळ आपल्या आरोग्यालाच हानी पोहोचवत नाही, तर कॅन्सरसारख्या घातक आजारालाही आमंत्रण देतो. हे ऐकल्यानंतर घाबरू नका, आज आम्ही तुम्हाला खरा-नकली तांदूळ ओळखण्याचा सोपा मार्ग सांगत आहोत. हे वाचल्यानंतर तुम्हाला कमी वेळात नकली तांदूळ ओळखता येतील.

First published:

Tags: Food, Marathi news, Top trending