Home /News /lifestyle /

प्रेग्नंट व्हायचंय, लैंगिक संबंध ठेवण्याची योग्य वेळ कोणती?

प्रेग्नंट व्हायचंय, लैंगिक संबंध ठेवण्याची योग्य वेळ कोणती?

वैज्ञानिकांच्या मते प्राण्यांमध्ये Environmental Toxicity मुळे हार्मोनल संतूलन बिघडल्याने प्रजनन क्षमतेवर परिणाम झाला आहे. माणासांमध्ये वातावरणातील वाढलेल्या केमिकलमुळे परिणामाची शक्यता तपासली जात आहे.

वैज्ञानिकांच्या मते प्राण्यांमध्ये Environmental Toxicity मुळे हार्मोनल संतूलन बिघडल्याने प्रजनन क्षमतेवर परिणाम झाला आहे. माणासांमध्ये वातावरणातील वाढलेल्या केमिकलमुळे परिणामाची शक्यता तपासली जात आहे.

मूल हवं आहे, यासाठी सेक्स करत असाल तर विशिष्ट कालावधी महत्त्वाचा आहे.

मुंबई, 09 जून: सेक्स (Sex) हा आरोग्याच्या आणि मातृत्वाच्या (Pregnancy) दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. परंतु, या घटकाविषयी दाम्पत्यांमध्ये अनेक समज-गैरसमज किंवा प्रश्न असतात. त्यांचं वेळीच निराकरण झालं तर लैंगिक जीवन अधिक आरोग्यदायी होतं आणि मातृत्वाचा हेतूही सफल होतो. जेव्हा एखाद्या दाम्पत्याला मूल हवं असतं किंवा ते त्या दृष्टीनं प्लॅनिंग करतात, तेव्हा काही प्रश्न त्यांच्या मनात असतात, की मूल व्हावं याकरिता लैंगिक संबंध ठेवण्याची नेमकी वेळ कोणती आणि या संबंधानंतर महिलांच्या शरीरात कशा पद्धतीनं प्रक्रिया सुरू होते? ही सर्व प्रक्रिया कशी असते, ते जाणून घेऊ या. काही महिलांना एकदाच लैंगिक संबंध ठेवल्यानंतर गर्भधारणा होते, तर काही महिलांना अनेकदा लैंगिक संबंध ठेवूनही गर्भधारणा होत नाही. अनेकदा प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसल्यानं महिलांवर एक प्रकारचा ताण आल्याचं दिसून येतं. आरोग्यविषयक तज्ज्ञांच्या मते, एका विशिष्ट वेळी लैंगिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. तज्ज्ञांच्या मते, स्त्रियांमध्ये ओव्ह्युलेशननंतरच (Ovulation) गर्भधारणा होऊ शकते. महिलांच्या अंडाशयातून बीजनिर्मिती आणि प्रसारण होण्याला ओव्ह्युलेशन म्हणतात. स्त्रियांच्या शरीरातलं बीज (Eggs) आणि पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणूंचा (Sperm) संयोग झाल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. स्त्रियांच्या शरीरात बीज प्रसारित होताना त्यांच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये शुक्राणू आले, तरच बीज आणि शुक्राणूंचा संयोग होऊन गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. परंतु, अनेक महिलांना ओव्ह्युलेशनचा निश्चित कालावधी माहिती नसतो. हे वाचा - कोशिंबीरमध्ये वापरा हे पदार्थ; वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ओव्ह्युलेशननंतर संयोगासाठी उपलब्ध असलेला कालावधी अत्यंत कमी असतो. त्यामुळे गर्भधारणा व्हावी, असं वाटत असेल तर ओव्ह्युलेशनचा कालावधी जवळ येताच लैंगिक संबंध ठेवण्यास सुरुवात करावी, असं तज्ज्ञ सांगतात. ओव्ह्युलेशननंतर संयोगासाठी (Conceive) सुमारे 12 तासांचा कालावधी लागू शकतो. ओव्ह्युलेशननंतर एका बीजाचं आयुष्यमान 24 तासांचं असतं. याचा अर्थ असा, की ओव्ह्युलेशननंतर 12 तासांच्या आत स्त्री-बीज आणि शुक्राणू यांचा संयोग झाला नाही, तर गर्भधारणेची शक्यता कमी होते. शुक्राणू गर्भाशयात (Ovaries) सुमारे 72 तासांपर्यंत जिवंत राहू शकतात. त्यामुळे ओव्ह्युलेशन होण्यापूर्वी 3 दिवस आधी लैंगिक संबंध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते. ओव्ह्युलेशनपूर्वी लैंगिक संबंध ठेवल्यास गर्भाशयात आलेले शुक्राणू स्त्री-बीज रिलीज होताच त्यांच्याशी संयोग करतात. ओवह्युलेशनची लक्षणं काय आहेत? ओव्ह्युलेशनचा कालावधी हा मासिक पाळीच्या (Periods) आसपास असतो. ओव्ह्युलेशनदरम्यान शरीराचं तापमान सर्वसामान्यपणे एका अंशाने वाढतं. ल्युटेनाइजिंग हॉर्मोन्सची पातळीदेखील वाढते. ही पातळी किती वाढली आहे हे होम ओव्ह्युलेशन किटद्वारे तपासता येतं. व्हजायननल डिस्चार्ज, स्तन ओढल्यासारखं वाटणं आणि पोटात एकाच बाजूला दुखणं हीदेखील ओव्ह्युलेशनची लक्षणं म्हणता येतील. हे वाचा - 45 वर्षांनी लहान नवरा कसं करतो प्रेम? 81 वर्षांच्या आजींनी उलगडलं बेडरूम सिक्रेट महिलांनी ओव्ह्युलेशनचा नेमका कालावधी जाणून घेण्यासाठी ओव्ह्युलेशन स्ट्रिप्सचा वापर करावा. यामुळे त्यांना ओव्ह्युलेशनचा निश्चित काळ कोणता आहे हे समजू शकतं. यामुळे प्रेगन्सीचं प्लॅनिंग करणं सोपं जातं.
First published:

Tags: Couple, Pregnancy, Pregnant, Relationship, Sex, Sexual health, Wife and husband

पुढील बातम्या