Home /News /lifestyle /

उन्हाळ्यातलं वरदान! झटपट वजन कमी करण्यासाठी अशी खा काकडी

उन्हाळ्यातलं वरदान! झटपट वजन कमी करण्यासाठी अशी खा काकडी

काकडीत बीटा केरोटीन आणि व्हिटॅमीन सी सारखे ऍन्टीऑक्सिडंट असतात.

काकडीत बीटा केरोटीन आणि व्हिटॅमीन सी सारखे ऍन्टीऑक्सिडंट असतात.

उन्हाळ्यात काकडी थंड म्हणून जरूर खावी. काकडी (cucumber health benifits) वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त असते. त्यासाठी ती कधी आणि कशी खावी जाणून घ्या.

    दिल्ली,1 जून :  वजन कमी (Weight loss) करण्यासाठी सोपा उपाय (Easy Tips) म्हणजे आहारात काकडीचा (cucumber) समावेश करावा. उन्हाळ्याच्या (Summer)दिवसात काकडी खाणं खूप फायदेशीर (Benefits) आहे. त्यात व्हिटॅमिन सी, ए,के,ल्युटन हे पौष्टिक (Healthy) पदार्थ असतात आणि भरपूर पाणी असतं. ज्यामुळे उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा(Dehydration) त्रास होत नाही. यात फार कमी प्रमाणात कॅलरीज (Calories) असतात. काकडीमध्ये 95 टक्के पाणी असतं. उन्हाळ्यात सर्वात जास्त शरीराला पाण्याची गरज असते. त्याबरोबर ऍसिडिटी आणि अपचनाचा त्रासही उन्हाळ्यात होत असतो. काकडी या दोन्हींसाठी फायदेशीर आहे. काकडीतील पाण्यामुळे शरीर डीहायड्रेड होत नाही आणि बद्धकोष्टतेचा त्रासही होत नाही. काकडीचे बरेच फायदे काकडीत बीटा केरोटीन आणि व्हिटॅमीन सी सारखे ऍन्टीऑक्सिडंट असतात. ज्यामुळे आपली इम्युनिटी वाढते. त्यामुळे कोणत्याही संसर्गापासून बचाव होण्यासाठी काकडी खाणं फायद्याचं आहे. (Coffee बिया वापरून पळवून लावा मच्छर, इतरही आहेत अनेक फायदे) सकाळी उठल्यावर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर, रात्री झोपताना काकडी खावी. यातील व्हिटॅमीन बी आणि इलेक्ट्रॉलाइट्स डोकेदुखीच्या त्रासात मदत करतात. चमकदाक स्किन हवी असेल तर, काकाडी खा. त्यामुळे केस, नखांमध्येही चमक येईल.काकडी  नियमीत खाण्याने  शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर फेकले जातात. काकडी शरीराला थंड करते. त्यामुळे ऍसिडिटीच्या त्रासातही आराम मिळतो. (Yoga Guide राग, चिडचिडेपणा यासह अनेक गोष्टींसाठी फायदेशीर ठरणारी आसनं) वजन कमी करण्यासाठी काकडी कॅलरीज कमी असल्याने काकाडी खाल्ल्याने पोट भरतं पण, कॅलरीज वाढत नाहीत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी काकडी खावी. 600 ग्रॅम काकडीत 4 ग्रॅम प्रोटीन आणि 0.6 ग्रॅम फॅट असतं. एवढच नाही तर, 2 काकडींमध्ये फक्त 28 टक्के कॅरलीज असतात. म्हणजे दिवसभरात तुम्ही कितीही काकडी खाऊ शकता. वजन कमी करण्यासाठी शरीरातील कॅलरीज बर्न होणं आवश्यक असतं. त्यामुळे काकडी खाऊन पोट भरतं आणि दिवसभरातील व्यायामुळे वजन कमी होतं जातं. काकडीत 90 टक्के पाणी असतं. त्यामुळे जेवणाआधी काकडी खा. ज्यामुळे पोट भरल्यासारखं वाटेल. नियमीतपणे खाल्ल्यास 2 ते 3 आठवड्यात फरक जाणवेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या