मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कोरोना काळात लहान मुलांना अनेक आजारांपासून कसे ठेवाल दूर? जाणून घ्या, काही टिप्स

कोरोना काळात लहान मुलांना अनेक आजारांपासून कसे ठेवाल दूर? जाणून घ्या, काही टिप्स

कोरोना (Corona) संसर्गापासून मुलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कुटुंबातील मोठया व्यक्तींची आहे.

कोरोना (Corona) संसर्गापासून मुलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कुटुंबातील मोठया व्यक्तींची आहे.

कोरोना (Corona) संसर्गापासून मुलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कुटुंबातील मोठया व्यक्तींची आहे.

  नवी दिल्ली, 28 डिसेंबर: आई-वडील (Parents) होणं, ही प्रत्येक जोडप्याच्या (Couple) आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आनंदायी गोष्ट असते. पण त्यासोबत अनेक आव्हानंही समोर येतात. कोरोना (Corona) संसर्गापासून मुलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कुटुंबातील मोठया व्यक्तींची आहे.  बाळाच्या आरोग्याची काळजी (Baby’s Health) घेणं, त्याचा आहार आणि त्याची देखभाल करणं ही पालकांची सर्वांत मोठी आणि प्राथमिक जबाबदारी होते. बाळ जोपर्यंत सहा महिन्यांचं होत नाही तोपर्यंत त्याच्या खाण्यापिण्याची चिंता कमी असते. मात्र, एकदा त्यानं वरचं अन्न (Food) खाण्यास सुरुवात केली की आरोग्याशी संबंधित (Health issues) अनेक समस्या त्याला त्रास देऊ लागतात. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या भांड्यांमध्ये बाळाला जेवण दिलं जात आहे त्यांची स्वच्छता. ही भांडी स्वच्छ आहेत की नाही किंवा ती कशी स्वच्छ करायची? या सर्व गोष्टी जाणून घेणं नव्याने आईवडिल झालेल्यांसाठी खूप महत्वाचं आहे. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमच्या बाळाच्या आरोग्याला हानी पोहोचत नाही.

  स्वच्छता (Hygiene) आणि आरोग्य (Health) या दोन्ही गोष्टींचं अस्तित्व एकमेकींवर अवलंबून आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता असते तिथे आरोग्याच्या समस्या कमी असतात. आजारी पडून औषधपाणी करण्याऐवजी अगोदरच स्वच्छतेची काळजी घेणं कधीही चांगलं.

  अशी कराल बाळाच्या भांड्यांची स्वच्छता

  सर्वात अगोदर बेबी बॉटल (Baby bottle), बाउल वॉश (लिक्विड क्लिंझर), डिश वॉशिंग बार (Dish washing bar) किंवा लिक्विडनं भांडी धुवा, नंतर पाण्यानं पुन्हा एकदा धुवा. पाण्यानं भांडी धुताना, एका कढईत भांडी ठेवा आणि त्यात भांडी बुडेपर्यंत पाणी घाला. पाण्याला एक उकळी येऊद्या. त्यानंतर भांडी बाहेर काढा.

  Health : व्हिटॅमिन B6 शरीराला यासाठी आहे गरजेचं; कॅन्सरपासून चार हात लांबच रहाल

  बाळाला ज्या बाटलीतून (Milk Bottle) किंवा भांड्यांमधून दूध पाजलं जातं त्यापासून संसर्ग होण्याचा धोका सर्वांत जास्त असतो. दुधाची बाटली निमुळती आणि अरूंद असते त्यामुळे ती धुणं थोडं कठीण जातं. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे बाटली निर्जंतुक (Sterile) करणं. त्यासाठी बाटली गरम पाण्यात उकळून घ्या. जेव्हा-केव्हा तुम्हाला बाळाला वरचं दूध पाजायचं असेल तेव्हा ती बाटली उकळत्या पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा. बाळ एक वर्षाचं होईपर्यंत बाटली अशाच प्रकारे स्वच्छ करावी.

  नवजात बाळं जास्त संवेदनशील असतात त्यामुळे त्यांची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. 4 ते 6 महिन्यांच्या बाळांसाठी, बाटली प्रत्येकवेळी व्यवस्थित निर्जंतूक (पाण्यात उकळणे) करून घेणं आवश्यक आहे. बाळाला 6 महिने पूर्ण झाल्यानंतर आठवड्यातून एकदाच बाटली निर्जंतूक करा. 7 महिने पूर्ण झाल्यानंतर किंवा प्रवासात बाहेरची भांडी वापरली जातील तेव्हा त्यांचं निर्जंतुकीकरण करा. बाळासाठी जर चांदीची भांडी (Silverware) वापरत असाल तर निर्जंतुकीकरणाची आवश्यकता नाही. कारण चांदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल (Anti-bacterial) आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. पण चांदीची भांडी स्वच्छ धुणं गरजेचं आहेच.

  थंडीत घशाच्या समस्येने त्रस्त आहात; अशा पद्धतीने लिंबाचं सेवन केल्यास मिळेल आराम

  जर तुम्ही बेबी फूड (Baby Food) ब्लेंड करणार असाल तर सर्वप्रथम मिक्सरचा जार स्वच्छ धुवा. कारण, अनेकदा मिक्सरचा जार दिसताना तर स्वच्छ दिसतो मात्र, त्याच्या ब्लेड्सजवळ पूर्वीचे पदार्थ चिटकून राहतात. त्यामुळं ते व्यवस्थित साफ करणं गरजेचं आहे. जार स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात पाणी घ्या. ते पाणी जारमध्ये टाका आणि मिक्सरवर फिरवून घ्या. तुम्हाला दिसेल की जारमधील पाणी खराब झालं आहे. जोपर्यंत जारमधील पाणी स्वच्छ राहत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करा. त्यानंतर तुम्ही त्यात बेबी फूड ब्लेंड करू शकता.

  संसर्गाची (Infection) शक्यता

  बाळांच्या खाण्यापिण्याची भांडी व्यवस्थित साफ नसल्यास त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अस्वच्छतेमुळं बाळांना अतिसार (diarrhoea), घसा खवखवणं, उलट्या होणे आणि कधी कधी संसर्ग होऊन तापही येतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी बाळांशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टींची व्यवस्थित स्वच्छता करणं गरजेचं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Corona, Health, Parents, Small baby