मुंबई, 28 डिसेंबर : लिंबू (Lemon) हे फळ आपण सर्वांच्या परिचयाचं असून, ते प्रत्येक स्वयंपाकघरात असतंच असतं. लिंबूपाणी, लिंबाचं सरबत खेड्यापासून शहरांपर्यंत सगळीकडे आवडीने प्यायलं जातं. प्रत्येक घरात विविध प्रकारे लिंबाचा वापर केला जातो. लिंबू आरोग्यासाठी फायदेशीर (Lemon Benefits) असून, लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत.
दररोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. सौंदर्य आणि आरोग्यासाठीदेखील लिंबू उत्तम आहे. त्यामुळेच लिंबांचा समावेश आहारात असणं आवश्यक आहे. लिंबाचे आरोग्यासाठी नेमके कोणते फायदे असतात, हे आपण जाणून घेणार आहोत.
किडनी स्टोन
लिंबू हा किडनी स्टोनवरचा घरगुती उपाय आहे. अनेकांना किडनी स्टोनचा त्रास असतो. लिंबाच्या सेवनाने किडनी स्टोनची समस्या कमी होते. लिंबामध्ये सायट्रेट असतं. सायट्रेट कॅल्शियम क्रिस्टल्स तयार होऊ देत नाही. लिंबाच्या सेवनाने फॅटी लिव्हरची समस्यादेखील दूर होते. लिंबामुळे शरीरातले विषारी घटक बाहेर पडतात. याचा यकृताला फायदा होतो आणि आरोग्य सुधारतं.
हे वाचा - थंडीत गरमागरम खायला हवं; पण हे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे माहिती आहे का?
पोटाच्या समस्या दूर राहतात
दररोज सकाळी लिंबूपाणी रिकाम्या पोटी (Empty Stomach) घेतलं, तर आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकतं. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून प्यावं. यामुळे शरीरातली विषारी द्रव्यं बाहेर पडतात आणि पचनसंस्थाही चांगली राहते. यामुळे बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते आणि त्यामुळे आजारी पडण्याचा धोकाही कमी असतो.
घसा चांगला होतो
घसा खराब झाला असेल, तर गरम पाण्यात लिंबाचा रस टाकून घेतल्यास फायदा होतो. लिंबूपाणी उकळू नये. फक्त कोमट करावं. पाणी उकळल्यास लिंबाचा प्रभाव कमी होतो. याचबरोबर कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्यासही फायदा होतो.
हे वाचा - 2021 मध्ये या भारतीय पदार्थांचा विदेशातही वाजला डंका, जाणून घ्या त्यांचे फायदे
त्वचेसाठी फायदेशीर
लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन-सी असते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं. याशिवाय, लिंबाचं सेवन त्वचेसाठीही खूप फायदेशीर असतं. यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. लिंबाच्या सेवनाने शरीरात चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. लिंबामध्ये पेक्टिन नावाचं फायबर असतं. ते प्रीबायोटिक असतं. ते निरोगी जिवाणूंच्या वाढीला प्रोत्साहन देतं. याचा शरीराला मोठा फायदा होतो. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी दररोज एक लिंबू आहारात असेल, तर आजारी पडण्याचा धोका कमी होतो. आयुर्वेदीयदृष्ट्यासुद्धा लिंबाला मोठं महत्त्व आहे.
सूचना - ही माहिती सर्वसामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही. अंमलबजावणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.