नवी दिल्ली, 28 डिसेंबर : अनेकांना नखे चावण्याची सवय (biting nails) असते. तुम्हीही असे करत असाल तर ही सवय खूप धोकादायक आहे. या सवयीला एक नाव देखील आहे, ते म्हणजे onychophagia. अनेकांना ही सवय लहानपणापासूनच लागते आणि वयानुसार ही सवय वाढत जाते. ही वाईट सवय का लागते आणि ती सोडण्याचे उपाय काय आहेत, याविषयी (habit of biting nails) जाणून घेऊयात. कंटाळा आल्यावर किंवा एखाद्या गोष्टीने निराश झाल्यावर अनेक लोक नखे चावून स्वतःला व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न करतात. काही लोक त्यांना एकाग्र करण्यासाठी चघळतात तर काही लोक नखांना लहान आकार देण्यासाठी त्यांना चघळतात. काही प्रकरणांमध्ये, एडीएचडी, नैराश्य विकार, चिंता विकार यासारख्या मानसिक समस्यांमुळेही लोक नखे चावू लागतात. नखे लहान आणि स्वच्छ ठेवा जर तुम्ही तुमच्या नखांची योग्य काळजी घेतली तर तुम्हाला नखे चघळता, चावताच येणार नाही. यासाठी नियमितपणे मॅनिक्युअर करा. नखं लहान ठेवली तर ती चघळण्याची सवयही सुटेल. नेल पॉलिश लावा नखांवर काही कडू चवीचे नेलपॉलिश लावा. बहुतेक नेल पेंट्स चवीला कडूच असतात. तुम्ही तुमच्या नखांना नेलपॉलिश लावून ती नखे तोंडात घालता तेव्हा तुम्हाला एक विचित्र चव जाणवते. अशा प्रकारे तुम्ही तुमचे नखे चावणे बंद करू शकता. हे वाचा - Weekly horoscope : 2021 वर्षातील तुमचा शेवटचा आठवडा कसा जाणार? नखांऐवजी काहीतरी चावणे अनेकांना तोंडात काहीतरी घालून चघळण्याची सवय असते. त्यांना ती वस्तू मिळाली नाही तर किंवा त्यांच्याकडे ती नसते तेव्हा ते नखं चावायला लागतात. जर तुमच्या बाबतीतही असेच होत असेल तर च्युइंगम, लॉलीपॉप किंवा गाजर यांसारख्या गोष्टी नेहमी चघळत रहा. हातमोजे घालणे जर तुम्हाला तुमची नखे जास्त चावण्याची सवय असेल तर हातात सरळ हातमोजे घाला. हा केवळ तात्पुरता उपाय असला तरी, तुम्ही कापसाचे हातमोजे घालू शकता जेणेकरून तुम्ही तुमचे नखे चावू शकणार नाही. हे वाचा - Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का? या संदर्भात डॉक्टर देखील सल्ला देतात की, एका वेळी फक्त एका बोटाचे नख चावण्यापासून स्वतःला प्रतिबंधित करा. जसे आधी तुम्ही तुमच्या अंगठ्याचे नख चावणे बंद करा, नंतर दुसरे बोट, नंतर तिसरे आणि शेवटी तुम्हाला दिसेल की तुमची नखे चावण्याची सवय पूर्णपणे बंद होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.