मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Health Tips : Vitamin B6 शरीराला यासाठी आहे गरजेचं; कॅन्सरपासून चार हात लांबच रहाल

Health Tips : Vitamin B6 शरीराला यासाठी आहे गरजेचं; कॅन्सरपासून चार हात लांबच रहाल

Health benefits of Vitamin B6 : व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे शरीरासाठी महत्त्वाचं पोषक तत्त्व आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये B6 हे मुख्य जीवनसत्त्व आहे. व्हिटॅमिन बी 6 ला पायरीडॉक्सिन (pyridoxine) देखील म्हणतात.

Health benefits of Vitamin B6 : व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे शरीरासाठी महत्त्वाचं पोषक तत्त्व आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये B6 हे मुख्य जीवनसत्त्व आहे. व्हिटॅमिन बी 6 ला पायरीडॉक्सिन (pyridoxine) देखील म्हणतात.

Health benefits of Vitamin B6 : व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे शरीरासाठी महत्त्वाचं पोषक तत्त्व आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये B6 हे मुख्य जीवनसत्त्व आहे. व्हिटॅमिन बी 6 ला पायरीडॉक्सिन (pyridoxine) देखील म्हणतात.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 26 डिसेंबर : शरीराला पोषक तत्त्वं योग्य प्रमाणात मिळाल्यास शरीर नेहमी निरोगी राहतं. मात्र, अलीकडे असं होत नाही. धावपळीच्या जीवनात आपल्या जीवनशैलीवर वाईट परिणाम झाला आहे. यामुळे आपल्याला अनेकदा कोणत्या ना कोणत्या पोषक घटकांच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे शरीरासाठी महत्त्वाचं पोषक तत्त्व आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये B6 हे मुख्य जीवनसत्त्व आहे (Vitamin B6).

व्हिटॅमिन बी 6 ला पायरीडॉक्सिन (pyridoxine) देखील म्हणतात. पायरोडॉक्सल 5 फॉस्फेट -पीएलपी (Pyridoxal 5’ phosphate -PLP) हे व्हिटॅमिन B6 चे मुख्य रूप आणि कोएन्झाइम (Coenzyme) आहे. हे पीएलपी शंभरहून अधिक एन्झाईम्सना त्यांच्या कामात (Health benefits of Vitamin B6) मदत करते.

व्हिटॅमिन बी 6 मेंदूचं आरोग्य आणि प्रतिकारशक्ती (immunity) राखण्यास मदत करतं. हे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतं. अलीकडील अभ्यासात असंही आढळून आले आहे की व्हिटॅमिन बी 6 पुरेशा प्रमाणात कर्करोगाचा धोका अनेक पटींनी कमी करतं. चला जाणून घेऊया, व्हिटॅमिन बी 6 चे शरीराला कोणते फायदे आहेत.

कर्करोगाचा धोका कमी करतं

रक्तात व्हिटॅमिन बी 6 योग्य प्रमाणात असल्यास कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. व्हिटॅमिन बी 6 कर्करोगाचा धोका कसा कमी करतं, याबद्दल वैज्ञानिकांना अद्याप पूर्णपणे माहिती नसली तरी, असं मानलं जातं की व्हिटॅमिन बी 6 दाह-विरोधी आहे. त्यामुळं ते शरीराचं अनेक प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण करतं.

हे वाचा - रोमँटिक डेट सुरु असतानाच आली अनोळखी व्यक्ती, महिलेचा चेहऱ्याचा उडाला रंग

हृदय निरोगी ठेवते

हार्वर्ड मेडिकल जर्नलनुसार, जेव्हा पीएलपी सक्रिय होतं, तेव्हाच प्रथिनं, कर्बोदकं आणि चरबी यांच्यावर योग्य ती अभिक्रिया होऊन त्यातून शरीराला उपयुक्त घटक मिळतात आणि विविध कार्य करण्यासाठी हे घटक तयार होतात. व्हिटॅमिन बी 6 रक्तातील होमोसिस्टीनची (homocysteine) पातळी योग्य राखतं. होमोसिस्टीनची पातळी वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. जर रक्तामध्ये व्हिटॅमिन बी 6 चं प्रमाण योग्य असेल तर रक्तातील रक्तवाहिन्यांमध्ये चिकट पदार्थ जमा होत नाही. यामुळं हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

महिलांसाठी अत्यंत उपयुक्त

व्हिटॅमिन बी 6 महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जर महिलांच्या रक्तातील व्हिटॅमिन सीचं प्रमाण योग्य असेल तर, ते प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोम किंवा पीएमएस (premenstrual syndrome, or PMS) कमी करतं. याशिवाय, हे गर्भधारणेदरम्यान महिलांना होणारी मळमळ कमी करतं. याशिवाय व्हिटॅमिन बी6 रक्त कमी होऊ देत नाही.

हे वाचा - Peanuts : मधुमेही रुग्णांसाठी शेंगदाणे फायदेशीर आहेत की घातक; जाणून घ्या त्याविषयी महत्त्वाची माहिती

या खाद्यपदार्थांमध्ये असतं व्हिटॅमिन बी6

टूना, सॅल्मन फिश, फोर्टिफाइड तृणधान्यं, केळी, पिस्ता, मोड आलेली किंवा अंकुरलेली धान्यं, एवोकॅडो, डाळी, अंडी, संत्री, पपई, हिरव्या पालेभाज्या, खरबूज आदी

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips, Lifestyle