मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

छोट्या-छोट्या गोष्टींमुळे नातं होईल खराब; सुखी संसारासाठी या चुका टाळा

छोट्या-छोट्या गोष्टींमुळे नातं होईल खराब; सुखी संसारासाठी या चुका टाळा

Relationship Tips: आपल्या जोडीदाराबरोबर असलेलं नातं निभावण्यासाठी शंभर टक्के इमानदारीचं आवश्यक असते असं तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही चूक कतर आहात...

Relationship Tips: आपल्या जोडीदाराबरोबर असलेलं नातं निभावण्यासाठी शंभर टक्के इमानदारीचं आवश्यक असते असं तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही चूक कतर आहात...

Relationship Tips: आपल्या जोडीदाराबरोबर असलेलं नातं निभावण्यासाठी शंभर टक्के इमानदारीचं आवश्यक असते असं तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही चूक कतर आहात...

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : कोणतंही नातं टिकवून ठेवण्याचा सगळ्यात महत्वाचा मार्ग (Important Way to Maintain a Relationship) म्हणजे त्यात प्रामाणिकपणा(Honesty) असावा लागतो. आपल्या जोडीदाराबरोबर चांगलं बॉन्डिग (Bonding With Partner)तयार करायचं असेल तर, त्यासाठी आपलं समर्पण(Surrender) शंभर टक्के असणंच आवश्यक असतं असं नाही. कारण सगळ्यांचा अनूभव (Experience) सारखा नसतो. कधीकधी एखाद्या व्यक्तीची काहीही चूक नसतानाही तुटणारी नाती(Broken Relationships) या जगात अहेत. रिलेशन (Relation) टिकवण्यासाठी सगळंकाही करूनही अपयशचं पदरात पडतं. प्रेमाच्या नात्यात पूर्ण समर्पण असावं पण, दुसऱ्याला महत्व देतादेता आपलं अस्तित्वचं गमवावं लागणार असेल तर, असं नातंही बिघडतंच. त्यामुळे अशा 4 गोष्टी आपण (Failure)जाणून घेउयात ज्या नातं टिकवण्यासाठी फायदेशीर आहेत. स्वतःचं अस्तित्व पणाला लावणं जोडीदारासाठी काहीही करण्याची तयारी असणं हे सुरुवातीला रोमँटिक वाटू शकतं पण, काही काळानंतर तेच वागणं एक ओझं वाटायला लागतं. खरंतर आयुष्यात, सोबत राहतांना आपले विचार आणि आपलं अस्तित्व जपावं लागतं. जोडीदाराला जास्त महत्व देण्याची तयारी असली तरी, यात आपलं स्वतःचं मत व्यक्त करता आलं पाहिजे. त्यामुळे स्वतःची ओळख विसरून नातं टिकवण्याचा प्रयत्न करू नका. (work from home tips : वर्क डेस्कवर ठेवा 'ही' झाडं; वाढेल कामाचा उत्साह) आपली मतं लादण्याचा प्रयत्न करू नये आपला जोडीदार अपलंच मत ऐकेल आणि सांगितलेली प्रत्येक गोष्ट करेल असा विचार मनामधून काढून टाका. नातं जास्तकाळ टिकवायचं असेल तर, त्यासाठी जोडीदाराच्या मताला महत्त्व द्या. त्याचे विचार जाणून घेऊन त्यांचा आदर करा. (प्रेग्नन्सीत कोरडा खोकला ठरू शकतो धोकादायक; लगेच करा हे 5 उपाय) जोडीदारालाचं आपलं संपूर्ण जग मानणं ज्यांचं आयुष्य केवळ जोडीदाराभोवती वसवले असतं ते निराश जीवन जगतात. जोडीदाराला महत्त्व देणं ही चांगली गोष्ट असली तरी, जोडीदाराला महत्त्व देण्याच्या प्रयत्नात स्वतःचं जग विसरणं चुकीचं आहे. त्यामुळे जोडीदार आपल्याला गृहीत धरण्यास सुरुवात करेल आणि तुमच्या इच्छेचं महत्त्व संसारात कमी होईल. त्यामुळे संसारातही आपल्या इच्छे प्रमाणे जगण्याला प्राधान्य द्या. (15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्रीच भारताला स्वातंत्र्य; तारीख, वेळेमागेही आहे इतिहास) तुलना करू नका प्रेमाला कोणत्याही पद्धतीने मोजण्याचा प्रयत्न करू नका. कारण जगातल्या सर्व दुःखांची सुरुवात अनावश्यक तुलनांपासून होते. त्यामुळे तुमच्या नात्याची तुलना इतर कोणाशीही करू नका.
First published:

Tags: Lifestyle, Relationship, Relationship tips, Save relationship

पुढील बातम्या