काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जवाहरलाल नेहरू यांनी 1929 साली ब्रिटिश सरकारपासून पूर्णपणे स्वंत्रतेची मागणी केली आणि 26 जानेवारीला स्वांत्र्यदिन साजरा करण्याती घोषणा केली. 1930 नंतरदेखील हा दिवस स्वतंत्रता दिन म्हणून साजराही करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिन होऊ शकला नाही. मग 1950 साली याच दिवशी भारताचं संविधान लागू झालं म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मानला गेला.
1945 साली दुसऱ्या जागतिक युद्धात ब्रिटनची आर्थिक स्थिती खराब झाली होती आणि राजकीय संकटही होतं. 1945 साली झालेल्या मतदानात ब्रिटनची लेबर पार्टी विजयी झाली. लेबर पार्टीने आपलं सरकार बनलं तर ब्रिटिश राजवटीतील देशांना मुक्त केलं जाईल, असं आश्वासन दिलं होतं आणि लेबर पार्टीचं सरकार येतात भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली.
भारताला हक्क सुपूर्द करण्यासाठी फेब्रुवारी 1947 साली माऊंटबेटन यांची नियुक्ती करण्यात आली. भारताला आपल्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी माऊंटबेटन यांनी एक मसूदा तयार केला. 30 जून 1948 ला सर्व हक्क भारताला सुपूर्द करणार असं या मसुद्यात नमूद होतं. मात्र भारतीय नेत्यांचं यावर एकमत झालं नाही. त्यांनी जून 1948 ही तारीख ठरवली ज्याला विरोध झाला आणि मग 1947 हेच वर्ष ठरलं.
जून 1947 ठरलं की भारताला ऑगस्टपर्यंत स्वतंत्र करायचं. माऊंटबेटन यांनी 15 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली. या तारखेबाबत माऊंटबेटन म्हणाले, 15 ऑगस्ट हीच तारीख ठरवली कारण याचदिवशी दुसरं महायुद्ध संपताना जपानने आत्मसमर्पण केलं होतं. माऊंटबेटन या तारखेला आपल्यासाठी शुभ मानत होते. तर दुसरीकडे भारतातील ज्योतिष तज्ज्ञ या तारखेला भारतासाठी अशुभ मानत होतं. त्यांनी दुसरी तारीख दिली मात्र माऊंटबेटन आपल्या निर्णयावर ठाम होते.
मध्यरात्रीच स्वातंत्र्य देण्याचं का ठरलं? - ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, 15 ऑगस्ट तारीख भारतासाठी शुभ नव्हती. त्यामुळे एक शुभे वेळ काढण्यात आली. 14 ऑगस्ट 1947 रात्री 11.51 ते रात्री 12 .39 ही वेळ शुभ होती. इंग्रजी कॅलेंडरनुसार रात्री 12 नंतर 15 ऑगस्ट सुरू होतो. मात्र भारतीय पद्धतीनुसार सूर्योदयानुसार तारीख बदलते. त्यामुळे मध्यरात्री 12 ही वेळ निश्चित झाली.