मुंबई, 6 जुलै : अॅव्होकाडो (Avocado) फळ हे आपले शारीरिक आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र हे फळ केवळ आरोग्यासाठीच (Avocado Health Benefits) नाही तर त्वचा आणि केसांचे नुकसान होण्यापासूनदेखील वाचवते. हे एक्जिमा आणि मुरुमांसारख्या त्वचेची स्थिती सुधारण्यास मदत करते, त्वचेची लवचिकता सुधारते, त्वचेला तरुण बनवते (Avocado Skin Benefits) आणि कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते. अॅव्होकाडोचे तेल (Avocado Oil Benefits) वापरल्यास त्याचा तुमच्या त्वचेला खूप फायदा होतो. अॅव्होकाडोमध्ये हेल्दी फॅट्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के 1, व्हिटॅमिन बी 6 आणि कार्बोहायड्रेट्ससह अनेक आवश्यक पोषक तत्व असतात.
त्वचेसाठी अॅव्होकाडो तेलाचे फायदे
मॉइस्चराइज आणि पोषण
व्हिटॅमिन ई व्यतिरिक्त, अॅव्होकाडो तेलामध्ये पोटॅशियम, लेसिथिन आणि इतर अनेक पोषक घटक असतात. जे त्वचेला मॉइश्चराइज करतात आणि पोषण देतात. त्वचेचा बाह्य थर ज्याला एपिडर्मिस म्हणतात ते या तेलातील पोषकद्रव्ये सहज शोषून घेतात. त्यामुळे नवीन त्वचा तयार होण्यास मदत होते.
पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार
वृद्धत्वाची चिन्हे कमी करते
वृद्धत्वाचे पहिले आणि सर्वात सामान्य चिन्ह म्हणजे त्वचेवर सुरकुत्या दिसणं. अॅव्होकाडोमध्ये आढळणारे हेल्दी फॅट्स त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यास आणि तरुण दिसण्यास मदत करतात. चेहऱ्यावरील सुरकुत्यासाठी अॅव्होकाडो तेल वापरणे हा एक चांगला पर्याय आहे. हे त्वचेच्या कोरडेपणाशी लढा देते. कोलेजन उत्पादन देखील वाढवू शकते.
मुक्त रॅडिकल्सशी लढा देते
मुक्त रॅडिकल्समुळे चेहऱ्यावर डाग, त्वचेच्या सुरकुत्या आणि त्वचेचा कर्करोग यासारखे सर्व प्रकारचे गंभीर बदल होतात. त्यामुळे त्वचेवर पोषक आणि अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेले अॅव्होकाडो तेल लावल्याने त्वचेवर हे बदल होण्याची शक्यता कमी होते.
उन्हामुळे त्वचा लाल होणे
अॅव्होकाडो तेलामध्ये आढळणारे बीटा-कॅरोटीन, प्रोटीन, लेसिथिन, फॅटी अॅसिडस् आणि जीवनसत्त्वे ए, डी आणि ई आपल्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यात मदत करतात आणि अतिनील किरणांमुळे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. उन्हात बाहेर गेल्यामुळे त्वचेला लालसरपणा येतो. हे कमी करण्यासाठी अॅव्होकाडो तेल मदत करते.
जखमा बऱ्या करते
अॅव्होकाडो तेल केवळ त्वचेच्या विकारांवर उपचार करू शकत नाही. तर जखमा देखील बरे करू शकते. संशोधन परिणाम सूचित करतात की लिनोलिक अॅसिड, ओलेइक अॅसिड आणि इतर मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडस् जखमेच्या उपचार प्रक्रियेस गती देतात. या तेलातील अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे एक्जिमा आणि सोरायसिसशी संबंधित आजरांमुळे त्वचा कोरडी होणे, इरिटेशन आणि त्वचेची जळजळ असे त्रास कमी करते.
Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम
पुरळ टाळण्यास मदत करते
अॅव्होकाडो तेलातील पोषक घटक त्वचेच्या एपिडर्मिसद्वारे सहज शोषले जातात. अॅव्होकाडो तेल त्वचेवर लावावे आणि नंतर कोमट पाण्याने धुऊन टाकावे. असे केल्याने त्वचा हायड्रेट राहते. त्यामुळे मुरुमांचा धोका कमी होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.