कॅनबेरा, 20 मे : हल्ली प्रत्येकाचा कल हा ऑनलाईन शॉपिंगकडे (Online shopping) असतो. त्यामुळे ऑनलाईन खरेदी-विक्रीचं प्रमाण वाढलं आहे. शॉपिंग वेबसाइटशिवाय सर्वसामान्यांनाही आपल्या वस्तू ऑनलाईन सेल करता याव्यात यासाठी त्यांच्यासाठी काही खास वेबासाइट्सही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अशाच एका वेबसाइटवर एक व्यक्ती आपली कार विकायला (Online car selling) गेली. पण कारसोबत व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टचे फोटोही इंटरनेटवर (Photo of man’s private part uploded with car) अपलोड झाले. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्समध्ये राहणारी ही व्यक्ती. तिने आपली कार ऑनलाइन विकायला काढली. एका कार सेलिंग वेबसाईटवर त्याने आपल्या गाडीची माहिती दिली आणि त्याची किंमतही टाकली. आपल्या कारचे काही फोटोही इंटरनेटवर अपलोड केले. अनेकांनी या कारची जाहिरात पाहिली आणि त्यांना शॉकच बसला. हे वाचा - OMG! पाचशे, हजार नाही तर तब्बल दीड लाख रुपये एक किलो; सोन्यापेक्षाही महाग मशरूम या कारच्या फोटोसह त्याच्या प्रायव्हेट पार्टचेही फोटो होते. कारसह आपल्या प्रायव्हेट पार्टचीही त्याने नकळतपणे जगभर जाहिरात केली. जवळपास 40 फोटो त्याने पोस्ट केले होते. या त्यापैकी कमीत कमी 2 फोटो असे होते, जिथं कारऐवजी या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट होता. ब्राउन कार्डिगन नावाच्या ट्विटर युझरला या जाहिरातील ही मोठी बाब लक्षात आली. त्याने या कारच्या जाहिरातीचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आणि हे सर्वांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर ही जाहिरात तुफान व्हायरल झाली. हा व्हिडीओ पाहून या व्यक्तीला ट्रोल केलं जाऊ लागलं. त्यानंतर त्याने तात्काळ आपली जाहिरात हटवली. आता ही कार विकली गेली की नाही हे मात्र माहिती नाही, असं news.com.au च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हे वाचा - शारीरिक संबंधांसाठी BFसमोर ठेवलेली अट महागात; तीनदा गाठलं हॉस्पिटल, अखेर ब्रेकअप पण यातून एक धडा आपण मात्र घ्यायला हवा. सोशल मीडिया असो, वेबसाइट असो, ऑनलाइन जाहिरात असो किंवा इतर कोणताही प्लॅटफॉर्म. तिथं फोटो टाकताना एकदा तपासून जरूर घ्या. ऑल सिलेक्ट ऑप्शन निवडून तुम्हीही असे फोटो अपलोड करत असाल तर चुकून तुमचाही नको तसा फोटो व्हायरल होऊ शकतो. त्यामुळे फोटो अपलोड करण्यापूर्वी एकदा त्यात काही आक्षेपार्ह किंवा तुमचा सिक्रेट फोटो तर नाही ना याची एकदा खात्री जरूर करून घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.