• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • OMG! पाचशे, हजार नाही तर तब्बल दीड लाख रुपये एक किलो; सोन्यापेक्षाही महाग का आहे हे मशरूम?

OMG! पाचशे, हजार नाही तर तब्बल दीड लाख रुपये एक किलो; सोन्यापेक्षाही महाग का आहे हे मशरूम?

भारतात सर्वात महाग अशा मशरूमचं (Mushroom) उत्पादन घेण्यात आलं आहे.

 • Share this:
  अहमदाबाद, 20 मे : मशरूम (Mushroom) तसं महागच असतं. तुम्ही फार फार तर एक किलो मशरून 500 किंवा चला जास्तीत जास्त हजार रुपये प्रतिकिलो पकडा. खरंतर ही किंमतपण जास्तच आहे. त्यामुळे मशरूम सोन्यापेक्षाही महाग आहे, असं सांगितलं तर थोडं आश्चर्यच वाटेल. भारतातील शास्त्रज्ञांनी असं मशरूप उत्पादित केलं आहे. ज्याची किंमत काही शे, हजारात नव्हे तर लाखोत आहेत. एक किलो मशरूमची किंमत तब्बल दीड लाख रुपये (Mushroom per kg 1.5 lakh rupees) आहे. गुजरातच्या शास्त्रज्ञांनी या सर्वात महाग मशरूमचं (Gujrat Mushroom) उत्पादन घेतलं आहे. कच्छमधील गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डेजर्ट इकोलॉजीच्या संशोधकांनी खास मशरूपचं उत्पादन घेतलं आहे. कोर्डिसेप्स मिलिटरिस असं या मशरूमचं नाव आहे. याची किंमत प्रति किलो 1.50 लाख रुपये  आहे. एका विशिष्ट तापमानात 35 जारमध्ये 90 दिवसांत हे मशरूम उगवण्यात आलं आहे. हे वाचा - 50% लोक Mask लावताना करतायेत सर्वात मोठी चूक; पाहा यात तुम्ही तर नाहीत ना? याची चव तर निराळी आहेच. पण औषधातही याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. चीन आणि तिबेटमध्ये हर्बल औषधांमध्ये या मशरूमचा सर्वाधिक उपयोग केला जातो. विशेषत कॅन्सरच्या औषधांमध्ये हे मशरूप वापरलं जातं. प्रामुख्याने ब्रेस्ट कॅन्सरच्या औषधासाठी या मशरूमचा वापर होतो. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार संस्थेचे संचालक वी. विजय कुमार यांनी सांगितलं, कॉर्डिसेप्स मिलिटेरिसला हिमालयीन सोनं म्हटलं जातं. याचे आरोग्याला अनेक फायदे आहे. जीवनशैलीशी संबंधित अनेक आजारांना रोखण्याची क्षमता यामध्ये असतं. आम्ही या मशरूमच्या अँटिट्युमरच्या दृष्टीने अभ्यास केला. या मशरूमचा अर्क चांगले परिणाम देऊ शकतो, असं आम्हाला दिसून आलं. हे वाचा - फक्त 250 रुपयांत घरीच करा कोरोना टेस्ट; Home testing आधी वाचा ICMR ची Advisory संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ कार्तिकेयन यांच्या मते, या मशरूमच्या वैद्यकीय ट्रायलसाठी परवानगी मागितली आहे. लवकरच आम्हाला मंजुरी मिळेल. प्रोस्टेट कॅन्सरवर याचा काय प्रभाव होतो, याचाही अभ्यास केला जातो आहे.
  Published by:Priya Lad
  First published: