मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /राशीभविष्य: 'या' राशींसाठी दिवस असणार मध्यम; पाहा काय आहे तुमची आजची ग्रहस्थिती

राशीभविष्य: 'या' राशींसाठी दिवस असणार मध्यम; पाहा काय आहे तुमची आजची ग्रहस्थिती

आज मंगळवार दिनांक 6 जुलै 2021. 12 राशींच्या भविष्यासोबतच आपण  जाणून घेऊ या राहू आणि केतू या ग्रहांबद्दल.

आज मंगळवार दिनांक 6 जुलै 2021. 12 राशींच्या भविष्यासोबतच आपण जाणून घेऊ या राहू आणि केतू या ग्रहांबद्दल.

आज मंगळवार दिनांक 6 जुलै 2021. 12 राशींच्या भविष्यासोबतच आपण जाणून घेऊ या राहू आणि केतू या ग्रहांबद्दल.

आज मंगळवार दिनांक 6 जुलै 2021.तिथी ज्येष्ठ कृष्ण द्वादशी.

आज  जाणून घेऊ या राहू  केतू बद्दल. हे दोन्ही छाया ग्रह आहेत. राहू  हा माया,अधिभौतिक सुख ,अति विलासी जीवन, अहंकार, भ्रम निर्माण करणारा ग्रह आहे. याचा प्रभाव आजच्या आधुनिक जगातल्या  माहिती आणि अतिप्रगत  तंत्रज्ञान  यावर आहे. हा पापग्रह असून ज्या ग्रहाला, स्थानाला ग्रासले त्याची फळे बिघडवतो. राहू म्हणजे  फक्त मस्तक.चंद्र अणि सूर्याला ग्रहण  लावतो. मानसिक व्याधी,स्त्री रोग, भ्रम,भटक्या व्यक्ती, तांत्रिक साधू, विचित्र व्यवसाय असणारे, गारुडी, आणि निदान ना होणारी दुखणी  याचे कारकत्व ,फळ  राहू कडे आहे. मिथुन ही राहूची उच्च राशी मानली जाते.तर धनु  नीच. उच्च स्थितीत अचानक शुभ  फळ, उच्च पद , आर्थिक लाभ  देतो. तर नीच अवस्थेत  देशोधडीला ला लावतो. याचे रत्न गोमेद  असून आर्द्रा,  स्वाती  व शततारका या नक्षत्रांचा स्वामी आहे. ओम  रं.राहावे  नम: हा जप करणे फायद्याचे ठरते.

आजचे बारा राशींचे भविष्य

मेष

आज चंद्र  वृषभ राशीत  भ्रमण करणार आहे. गेले दोन दिवस जाणवणारा निरुत्साह संपून आज तुम्ही  कामाला सज्ज व्हाल. आर्थिक लाभ संभवतात  कुटुंब अणि घर  यांना  तुम्ही प्राथमिकता द्याल. घर  सजावट करण्याचा मूड येईल. दिवस  उत्तम आहे.

वृषभ

आज राशीतील  राहु चंद्र  भ्रमण तुम्हाला  हुरहूर लावेल.आर्थिक लाभ होतील. कारण नसताना मन व्यग्र राहील. तृतीय स्थानातील  सूर्य  धैर्य आणि चिकाटी वाढवेल. कार्यकक्षेत नेहमीच्या कामाचा ताण वाढेल .दिवस  बरा आहे.

मिथुन

आज व्यय स्थानातील  चंद्र राहू मनावर  सावट आणणार. आर्थिक  व्यय  संभवतो. राशीत सूर्य आहे, अधिकारी वर्गाची कुरकुर ऐकावी लागेल. धन, कुटुंब, वाणी या  बाबत जरा जपून  बाकी गुरुकृपा सर्व संकटाचे निवारण करेल. दिवस  मध्यम .

कर्क

लाभातील चंद्र राहू  अचानक मैत्रिणीकडून लाभ मिळवुन देईल. तुमच्या चांगल्या कामासाठी मदत मिळेल. आर्थिक बाजु चांगली राहील. आठवा गुरू  सध्या तुम्हाला अनुकूल नाही. फारशी अपेक्षा  ठेऊ नका. दिवस बरा जाईल.

सिंह

कामाच्या ठिकाणी  काही तरी नवीन भानगड, समस्या  उत्पन्न होईल. त्याचे उत्तर शोधण्यात दिवस जाणार आहे. खर्च वाढेल. तुमच्या जोडीदाराकडून मिळणारा सल्ला  ऐकणे फायद्याचे ठरेल. दिवस बरा आहे.

कन्या

आज दिवस अनुकूल आहे. पण चंद्र राहू भाग्य स्थानात शुभ कार्याला अडथळा निर्माण करतील. लोकांवर तुमचा अपेक्षित प्रभाव पडणार नाही. प्रवास योग टाळा .दिवस शांततेत घालवा.

तुला

अष्टमात असलेले चंद्र राहू  विनाकारण  चिंता  लावतील .हुरहूर, कुठेतरी  वेदना  जाणवतील. डोळ्यांची काळजी घ्या. आर्थिक स्थिती ठीक राहील. गुरु कृपा  आहे. निभावून न्याल. दिवस मध्यम.

वृश्चिक

राशी समोरील  चंद्र राहू  मनाला हुरहूर लावणार आहेत. नवीन काम  सुरू करू नका. जोडीदाराकडून फार अपेक्षा करू नका व्यवसायात आज लाभ संभवतात. दिवस बरा आहे.

धनु

षष्ठ स्थानातील चंद्र राहू भ्रमण आणि  अष्टमात मंगळ तुम्हाला शारीरिक त्रास दर्शवतात. आज कुठल्याही प्रकारचे धाडस नकोच. स्वतःला चांगल्या कामात गुंतवून दिवस शांततेत घालवा.

मकर

आज पुन्हा  कुठल्याही कारणाने  दवाखान्या ची  वारी होऊ शकते. मुलांसाठी, किंवा  कोणाला मदत म्हणुन तुमची गरज लागेल. मुलांसाठी काही कारणाने मन चिंतित राहील.

आर्थिक बाजू ठीक. सांभाळुन राहावे. दिवस मध्यम आहे.

कुंभ

आज तुम्ही तुमच्या स्वतः साठी  काही वेळ द्याल. काही घरात जास्तीचे काम असेल  तर ते आधी  करून  मग दिवस  शांततेत,घरात घालवाल. काही वाचन किंवा  झोप घ्याल.

दिवस बरा आहे.

मीन

आज मंगळवार अचानक काही  प्रवास योग येतील. काही  महत्त्वाचा संवाद साधावा लागेल. पण त्यात काही  गैरसमज  होणार नाहीत याची काळजी घ्या. आर्थिक नियोजन नीट करा. प्रकृती चांगली राहील. दिवस शुभ.

शुभम भवतु!!

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya