Home /News /lifestyle /

Reduce Anger: सतत चिडचिड-रागावणे आरोग्यासाठी आहे घातक; हे उपाय करून बघा परिणाम

Reduce Anger: सतत चिडचिड-रागावणे आरोग्यासाठी आहे घातक; हे उपाय करून बघा परिणाम

ज्या लोकांना खूप राग येतो त्यांना अनेकदा आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतं. तुम्हालाही खूप राग येत असेल तर ज्योतिषशास्त्रात यावर काही उपाय सांगितले आहेत.

    मुंबई, 30 जून : रागावणे हा माणसाचा स्वभाव आहे. सगळ्याच लोकांना राग येतो, पण छोट्या-छोट्या गोष्टींवर खूप राग येणं योग्य नाही. रागामुळे माणूस स्वतःचे नुकसान करतो. काही वेळा यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. अत्याधिक रागात माणसाला योग्य आणि अयोग्य यातील फरक कळत नाही. हे आरोग्यासाठीही हानिकारक मानले जाते. ज्या लोकांना खूप राग येतो त्यांना अनेकदा आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतं. तुम्हालाही खूप राग येत असेल तर ज्योतिषशास्त्रात यावर काही उपाय सांगितले आहेत. भोपाळचे ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी याबाबत (Measures to reduce anger) माहिती दिली आहे.. राग का येतो? ज्योतिषशास्त्रानुसार राग येण्याचे मुख्य कारण मंगळ, सूर्य, शनि, राहू आणि चंद्र हे ग्रह आहेत. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य-चंद्र, मंगळ एकमेकांशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंध निर्माण करत असतील तर त्या व्यक्तीला अपेक्षेपेक्षा जास्त राग येतो. क्रोध हे अग्नि तत्वाचे लक्षण आहे. जेव्हा हे अग्नि तत्व इतर राशी किंवा ग्रहांशी जोडले जाते तेव्हा व्यक्तीला खूप राग येतो. ज्योतिष शास्त्रात सांगितले आहे की, ज्या लोकांचा मंगळ चांगला नाही त्यांच्यात राग आणि कामुकता जास्त असते. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्योतिष उपाय - ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की, चंदनाच्या सुगंधाने रागावर नियंत्रण ठेवता येते. ज्या व्यक्तीला जास्त राग येतो त्याने आपल्या भोवती चंदनाचा वापर करावा. असे मानले जाते की चंदनाच्या वापराने राहू दोष दूर होतो आणि राग शांत होतो. याशिवाय ज्या लोकांना खूप राग येतो, त्यांनी चंद्राला अर्घ्य द्यावे. चंद्र हे शीतलतेचे प्रतीक आहे. हे वाचा - पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या उपायांपैकी एक उपाय म्हणजे पृथ्वी मातेला नमन करण्याची सवय लावा. असे मानले जाते की ज्यांना खूप राग येतो त्यांनी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम पृथ्वी मातेला नमस्कार करावा. यानंतर उजवा पाय जमिनीवर ठेवा. ज्या लोकांना खूप राग येतो, त्यांनी हेही लक्षात ठेवावे की सकाळी उठल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटे कोणाशीही बोलू नये, मन शांत ठेवावे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या