मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: इंग्लंडच्या माजी कॅप्टनचा दावा, 'बुमराह-शमीच्या आई-वडिलांनीही कधी...'

IND vs ENG: इंग्लंडच्या माजी कॅप्टनचा दावा, 'बुमराह-शमीच्या आई-वडिलांनीही कधी...'

लॉर्ड्स टेस्टमध्ये झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून (India vs England 2nd Test) इंग्लंडची टीम अजूनही सावरलेली नाही. इंग्लंडच्या माजी कॅप्टननं जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) पार्टनरशिपबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
मुंबई, 21 ऑगस्ट : लॉर्ड्स टेस्टमध्ये झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून (India vs England 2nd Test) इंग्लंडची टीम अजूनही सावरलेली नाही. इंग्लंडनं जिंकत असलेली मॅच गमावली हे  माजी क्रिकेटपटूंना सहन झालेलं नाही. इंग्लंडचा माजी कॅप्टन डेव्हिड गॉवरनं (David Gower) या टेस्टमधील पराभवानंतर त्यांच्या टीमवर टीका केली असून टीम इंडियाचा विजयाला पात्र आहे, असं मत व्यक्त केलं आहे. गॉवरनं यावेळी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) पार्टनरशिपबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. हे दोघं 89 रनची पार्टनरशिप करतील असं त्यांच्या आई-वडिलांनाही कधी वाटलं नसेल, असं मत गॉवरने व्यक्त केलं आहे. डेव्हिड गॉवरनं क्रिकेट डॉट कॉमला सांगिकले की, 'मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह जोडीनं नवव्या विकेटसाठी 89 रनची पार्टनरशिप केली हे जगातील आश्चर्य होते. इतर सर्व सोडा त्यांच्या आई-वडिलांनी, कुटुंबीयांनी देखील याचा कधी विचार केला नसेल. पाचव्या दिवशी इंग्लंडची टीम भावनेच्या भरात खेळली. बुमराह आणि अँडरसन यांच्यात झालेल्या वादाच्या वेळी ते दिसले. भावनांवर नियंत्रण ठेवणे हे सर्वात आवश्यक असेत. त्यामुळे तुमची रणनीती बिघडली. जो रूटला देखील हे मान्य करावं लागेल,' असं गॉवरने सांगितले. इंग्लंड टीममध्ये बदल लॉर्ड्स टेस्टमध्ये (Lords Test) झालेल्या पराभवानंतर यजमान टीमनं 3 खेळाडूंची हकालपट्टी केली आहे. त्याचबरोबर डेव्हिड मलान आणि साकिब महमूद या दोघांचा समावेश केलाय. तिसरी टेस्ट  (India vs England, 3rd Test)  25 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियाला रोखण्यासाठी इंग्लंडनं नवी रणनीती बनवण्यास सुरूवात केली आहे. या टेस्टमध्ये इंग्लंडच्या बॅटींग ऑर्डरमध्ये बदल होणार असल्याचं वृत्त ब्रिटीश मीडियानं दिलं आहे. IND vs ENG: राहुलमुळे झाली टीम इंडिया मजबूत, पण जिवलग मित्राच्या करिअरला लागला ब्रेक लीड्समध्ये इंग्लंडची टीम नव्या ओपनिंग जोडीसह उतरणार आहे. रॉरी बर्न्स सोबत हसीब हमीद ओपनिंग करणार आहे. हमीद लॉर्ड्स टेस्टमध्ये तिसऱ्या नंबरवर खेळला होता. तर जगातील नंबर 1 टी 20 बॅट्समन डेव्हिड मलान तिसऱ्या नंबरवर खेळणार असल्याचं वृत्त आहे.
First published:

Tags: Cricket news, India vs england

पुढील बातम्या