मुंबई, 21 ऑगस्ट : मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत कालपासूनच पाऊस (Rain in Mumbai) पडत असल्याचं दिसत आहे. काल रात्री पावसाने अधिक जोर धरला असून आता पुढील तीन ते चार तासांत मुंबईसह आसपासच्या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून (IMD predicts moderate to intense spells of rain) वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात रात्रभर काही प्रमाणात हलका ते जोरदार पाऊस झाला. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांतील काही भागांत पुढील तीन ते चार तासांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठाणे, कल्याण, रायगड परिसर आणि मुंबईच्या किनारपट्टीच्या भागात प्रचंड काळे ढग दिसून येत आहेत.
Nowcast warning issued at 0830 Hrs 21/8/2021 :
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 21, 2021
Moderate to intense spells of rain very likely to occur at isolated places in the districts of #Palghar, #Thane and #Mumbai during next 3-4 hours.
-IMD MUMBAI
‘भाजपची अवस्था म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली’, शिवसेनेची टीका पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा 21 ऑगस्ट कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता मराठवाडा - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता विदर्भ - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता 22 ऑगस्ट कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
23 ऑगस्ट कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे आणि आसपासच्या परिसरात काय स्थिती ? 21 ऑगस्ट - आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 22 ऑगस्ट - आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी / संध्याकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे 23 ऑगस्ट - आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.